फिडे रॅपिड रेटींग बुध्दीबळ स्पर्धेत निकिताचे यश

0
नंदुरबार / अखिल मराठी बुध्दीबळ संघटनेच्या मान्यतेने व कल्याण तालुका बुध्दीबळ संघटनेतर्फे नुकत्याच कल्याण (ठाणे) येथे दुसर्‍या आंतरराष्ट्रीय फिडे रॅपिड रेटिंग बुध्दीबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धेकरिता विविध गटासाठी ए.सी.क्लबच्या निकिता राजेंद्र बागुल (एस.ए.मिशन प्रायमरी स्कुल), वैभव पाटील (एकलव्य विद्यालय), विनीत बागुल (एस.ए.मिशन हायस्कूल) या 3 खेळाडूंची निवड नंदुरबार जिल्हा हौशी बुध्दीबळ संघटनेतर्फे करण्यात आली होती.

अश्वमेघराज चेस क्लबची नवोदित खेळाडू निकिता राजेंद्र बागुल हिने 6 वर्षाखालील गटात उत्कृष्ट खेळ करत प्रथम क्रमांक पटकाविला.

तिला गौरवचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. तर स्पर्धेसाठी खुल्या गटात खेळतांना क्लबचा मानांकन प्राप्त खेळाडू वैभव पाटील (एकलव्य विद्यालय) याच्या उत्कृष्ट खेळीमुळे त्याच्या मानांकनात 9 गुणांची भर पडणार आहे.

विनीत बागुल (एस.ए.मिशन हायस्कूल) याने 4 गुण प्राप्त केले.

 

LEAVE A REPLY

*