ग्रा.पं.ते जि.प.वर सत्ता स्थापन करण्याचे स्वप्न पूर्ण करा !

नंदुरबार । दि.13 । प्रतिनिधी-नंदुरबार जिल्ह्यातून डोळ्यासमोर रणसंग्राम दिसत आहे. प्रत्येकाच्या मनातील स्वप्न बघण्यापेक्षा त्याला कृतीतून उतरविणे महत्वाचे आहे.
नंदुरबार जिल्हा भगवामय झाला पाहिजे. घराघरांवर भगवा दिसला पाहिजे व प्रत्येक ग्रामपंचायतीपासून जिल्हा परिषदेपावेतो सत्ता हाती आणण्याचे स्वप्न साकार करण्याचे शिवसैनिकांचे कर्तव्य आहे.
याकरीता सगळ्यांनी एकत्र येवून काम करायला शिकले पाहिजे, असे शिवसेनेचे धुळे-नंदुरबार जिल्हा संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांनी नंदुरबार येथील शासकीय विश्रामगगृह येथे झालेल्या नवनियुक्त पदाधिकार्‍यांच्या सत्कार समारंभाप्रसंगी सांगितले.

त्या अनुषंगाने नवनियुक्त पदाधिकार्‍यांचा नंदुरबार येथे सत्कार समारंभ घेण्यात आला. यावेळी धुळे-नंदुरबार जिल्हा संपर्कप्रमुख बबनराव थोरात, सहसंपर्क प्रमुख संजय उकीरडे, जिल्हा प्रमुख आमश्या पाडवी, डॉ.विक्रांत मोरे, उपजिल्हा प्रमुख धनराज पाटील, गोटू पाटील, गणेश पराडके, जिल्हा संघटक लक्ष्मण वाडीले, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख नवरतन टाक, तालुकाप्रमुख जयप्रकाश परदेशी, गणेश वडनेरे, मधुकर मिस्तरी, अनुप उदासी, रमेश पाटील आदी उपस्थित होते.

यावेळी संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांनी सांगितले की, विनंती करून काम होत नसेल तर सामनेवाल्या अधिकार्‍याला शिवसेनेची भाषा शिकवली पाहिजे.

आपल्याला नंदुरबार जिल्ह्यातून काँग्रेस पक्षाचे पक्षत्व नष्ट करायचा आहे. आपला पक्ष गरजवंतांना मदत कणारा, संकटाप्रसंगी धावून जाणारा आहे असे त्यांनी सांगितले. यावेळी उपजिल्हा प्रमुख हसमुख पाटील यांनी सुत्रसंचालन केले व उपस्थितांचे आभार मानले.

 

LEAVE A REPLY

*