नवापूर येथे 28 हजाराची घरफोडी

नवापूर । दि.12 । प्रतिनिधी-शहरातील लाखानी पार्कमध्ये अज्ञात चोरटयांनी घरफोडी करुन लॅपटॉपसह मोबाईल असा एकुण 28 हजाराचा मुद्देमाल लंपास केला.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशातील दादरी तालुक्यातील जीएचव्ही कंपनीतील इंजि.अरुणकुमार जगुलसिंह हे नवापुरातील लाखानी पार्कजवळ आदर्श नगरमध्ये राहतात.
दि 4 ते 8 जुलै दरम्यान बाहेरगावी असल्याने चोरटयांनी संधी साधत बंद घरातील कडीकोंडा व कुलुप तोडुन आत प्रवेश करुन 20 हजाराचे लॅपटॉप तर 8 हजाराचा मोबाईल असा एकुण 28 हजाराचा मुद्देमाल लंपास केला.

याबाबत नवापूर पोलीसांत भादंवि कलम 380,457,454,प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक विजयसिंग राजपुत यांनी गुप्त माहितीवरुन व पथक तयार करुन 24 तासाच्या आत आरोपीना पकडण्यात यश मिळविले आहे.

सिध्दार्थ राजु मराठे (वय 22 रा भगतवाडी नवापूर), राहुल बाबु गोसावी (वय 26 रा धडधडया नवापूर) यांना पकडण्यात आले आहे. त्यांनी गुन्हात चोरीस गेलेला लॅपटॉप व मोबाईल हे मुद्देमाल काढुन दिले आहेत.

सदर गुन्हा उघडकीस आणण्याकामी पोलिस निरीक्षक विजयसिंग राजपुत यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.महेंद्र नगराळे, अमित शेवाळे, दिलीप चौरे, योगेश थोरात, शांतीलाल पाटील, आदीनाथ गोसावी, किरण धनगर यांनी ही कामगिरी केली आहे.पुढील तपास पो.हे महेंद्र नगराळे करीत आहे.

दरम्यान, पोलीसांनी घटना घडल्यानंतर अवघ्या चोवीस तासात दोघा आरोपींना मुद्देमालासह अटक केल्याने त्यांच्या कारवाईचे स्वागत होत आहेत. त्यामुळे पोलीसांचे मनोबल उंचावले असून चोरटयांमध्येही दहशत निर्माण झाली आहे.

 

 

LEAVE A REPLY

*