हनुमान मंदीर ते छबिलदास चौक डांबरीकरणाची चौकशी करा : सराफ गल्लीतील रहिवाशांची मागणी

0
नवापूर । दि.12 । प्रतिनिधी-शहरातील सुशिक्षित व प्रतिष्ठित लोकवस्ती असलेल्या हनुमान मंदिर ते ठाकोर छबिलदास चौक सराफ गल्ली भागातील डांबरीकरण रस्त्याची सखोल चौकशी करण्याची मागणी सराफ गल्लीतील रहिवाशांनी केली आहे.
बहुचर्चित असलेल्या सराफ गल्लीतील निकृष्ट दर्जाचे डांबरीकरण प्रकरण रहिवाशांचा जागृतीने उघडकीस आले त्यानंतर रहिवाशांनी विरोध, निवेदने देऊन तक्रारी यापुर्वी केल्या आहेत डांबरीकरण केल्यानंतर एका महिन्यांनी उन्हाळ्यात डांबर वितळून कपची बाहेर आली होती.
जागोजागी खड्डे पडले याबाबत रहिवाशांनी तक्रारी केल्या पावसाळ्यात तर या भागात तलावाचे स्वरूप प्राप्त होत आहे रस्ता परत करून देतो असे आश्वासन देऊन ते अद्याप झालेले नाही अखेर आज सराफी गल्लीतील असंख्य महिला पुरुष युवा वर्ग यांनी नगर पालिकेत जाऊन मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे यांची भेट घेऊन संतप्त भावना व्यक्त केल्या.

त्यांचाशी चर्चा केली व यावेळी मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे यांनी आठ दिवसात समस्या सोडविण्यात येतील असे आश्वासन दिले.

यावर रहिवाशांनी सांगितले की आठ दिवसांत आमच्या समस्येचे निराकरण व रस्त्याचे निपक्षपाती चौकशी झाली नाही तर भिक मांगो आंदोलन करू असा इशारा दिला. यानंतर निवेदन दिले.

निवेदनात म्हटले आहे, नवापूर नगर परिषद हद्दीतील सराफ गल्लीतील हनुमान मंदिर ते ठाकोर छबिलदास चौक रस्ता डांबरीकरणाचे काम मार्च एप्रिल 2016 मध्ये एका ठेकेदाराला देण्यात आले होते.

सदर रस्त्याच्या कामात पालिका अधिकृत इंजीनियर यांनी रस्त्याचे इस्टीमेट बनविण्यापासुन ठेकेदाराने बनवलेले निकृष्ट नियोजनशुन्य कामापर्यत अधिकारी आणि ठेकेदारांचा संगनमताने डांबरी रस्त्याचे काम अगदी घाईघाईत केल्याने रस्त्याची पहिल्याच पावसात दुर्दशा झाली आहे.

सदर रस्त्याच्या कामात इस्टीमेटप्रमाणे मटेरियल न वापरता अत्यंत निकृष्ट दर्जाचे वापरल्याचे प्रत्यक्ष दर्शी रहिवाशांचे म्हणणे आहे. सदर रस्त्याची गुणवत्ता त्रयस्थ समितीकडून चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी.

सदर रस्त्याची दर्जा व गुणवत्ता क्वालिटी कंट्रोल शासनाच्या अधिकृत संस्थेकडुन पारदर्शक चौकशी आठ दिवसाचा आत करण्यात यावी अन्यथा सराफ गल्लीतील सर्व रहिवासी भीक मांगो आंदोलन करून आलेली भीक पालिकेला देण्यात येईल असा इशारा दिला आहे.

यावेळी रहिवाशांनी संबंधित प्रभागातील लोकप्रतिनिधी यांच्या बदल संतप्त प्रतिक्रया व्यक्त केल्या. सदर निवेदन तहसीलदार व पोलीस निरीक्षकांनाही देण्यात आले. निवेदनात भरत रामदास पाटील, दिलीप दलाल, शरदचंद्र पाटील, डॉ.के.बी. भट, भटु सोनार, हरीश पाटील, दर्शन पाटील, मंगेश येवले, प्रेमेंद्र पाटील, जयंतीलाल शहा, दर्पण पाटील, मनोज दलाल, हेमा जोशी, दिलीप पाटील, मेहुल पारेख, अल्पेश दलाल, जनक दलाल, सचिन पाटील आदींसह पदाधिकार्‍यांच्या सह्या आहेत.

 

LEAVE A REPLY

*