एमएचटी-सीईटी प्रवेश परीक्षेसाठी 5690 परीक्षार्थी

0

नंदुरबार / महाराष्ट्र शासना मार्फत अभियांत्रिकी व औषधनिर्माण शास्त्र अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी राज्यात शासनाच्यावतीने एमएचटी-सीईटी ही सामाईक प्रवेश परिक्षा दि.11 मे रोजी सकाळी 9 ते दुपारी 5 या वेळेत 16 उपकेंद्रावर घेण्यात येणार आहे.

या परीक्षेसाठी नंदुरबार जिल्हयातील एकुण 5690 परीक्षार्थी बसलेले आहेत.

शहरातील श्रीमती एच.जी. श्रॉफ हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय नंदुरबार (भाग 1), श्रीमती एच.जी. श्रॉफ हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय नंदुरबार (भाग 2), जी.टी.पी कॉलेज, नंदुरबार (भाग 1), जी.टी.पी कॉलेज, नंदुरबार (भाग 2) एन.टी.व्ही.एस. लॉ कॉलेज, नंदुरबार, एन.टी.व्ही.एस. बी.एड अँड यशवंत विद्यालय, नंदुरबार, डॉ. काणे गर्ल हायस्कुल, नंदुरबार, श्रीमती डी.आर. हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय, नंदुरबार, एस.एम.एस. अण्णासाहेब पी.के. पाटील माध्यमिक विद्यालय, नंदुरबार, शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय, नंदुरबार, एस.ए. मिशन (इंग्रजी माध्यम) हायस्कुल नंदुरबार, एस.ए. मिशन (मराठी माध्यम) नंदुरबार भाग 1, एस.ए. मिशन (मराठी माध्यम) नंदुरबार भाग 2, कमला नेहरु कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, नंदुरबार भाग 1, कमला नेहरु कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, नंदुरबार भाग 2, एकलव्य विद्यालय व कनिष्ठ विद्यालय, नंदुरबार या केंद्रांवर परिक्षा घेण्यात येणार आहे.

परीक्षेसाठी नमूद उपकेंद्रावर पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. उपकेंद्रनिहाय तक्रार निवारण समिती स्थापन करुन कायदा व सुव्यवस्थेसाठी सर्व उपकेंद्रपरिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (2) अन्वये प्रतिबंधात्म आटेश जारी करण्यात आलेले आहेत.

 

LEAVE A REPLY

*