फैज पतसंस्थेत सव्वा दहा लाखाचा अपहार

0

नंदुरबार / नंदुरबार शहरातील सुतार मोहल्यात फैज नागरी सहकारी पतसंस्थेत एकास 16 जणांनी संगणमताने 10 लाख 28 हजार 400 रूपयाचा अपहार केला.

गुलाम अली मसुद खान पठाण रा.जामा मस्जिद (नंदुरबार) याने दिलेल्या फिर्यादीनुसार, नंदुरबार शहरातील फैज नागरी सहकारी पतसंस्था येथील कार्यकारिणीतील संचालक व एजंट शेख रोशन शेख महेबूब कुरेशी, शेख वाहब शेख चहातअली, सैय्यद अजहरमियाँ मजरमियाँ, राहतअली चाहतअली, शेख बाबुलाल शेख, उस्मान धोबी, शेख अहमद हाजी कुरेशी, शेख हरूण शेख हाजी अब्दुल रज्जाक कुरेशी, गनी इस्माईल भाई मेमन, शेख कदीर शेख हाजी शेख अमीर, शेख संगिनाबी शेख रोशन कुरेशी, तस्लिम बी लतीफ शाह, लतीफ शाह सिकंदर शाह, सैय्यद इम्तियाज अली शब्बीर, मोसीन शाह लतीफ शाह, सैय्यद मोसीन सैय्यद समर, शेख खलील अब्दुल समद कुरेशी, शेख रफिक शेख शफी आदी 17 जणांनी संगणमताने स्वतःच्या फायद्यासाठी कर्जाची व लकी ड्राची खोटी माहिती फिर्यादीन, गुलाम अली याला दिली.

तसेच इतर खातेदारांचे मन वळवून मासिक बचत ठेव योजनेत त्यांची फसवणूक करून त्यांना सभासद करून घेण्यात आले व एकूण 10 लाख 28 हजार 400 रूपयांचा अपहार या सर्वांनी केला.

याप्रकरणी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात 17 जणांविरूध्द भादंवि 420, 406 व 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

*