उमर्दे गावात दारुबंदीच्या मागणीसाठी ग्रामपंचायतीला घेराव

0
नंदुरबार | प्रतिनिधी : तालुक्यातील उमर्दे खुर्दे येथे गावात दारूबंदी करावी या मागणीसाठी आज ग्रामपंचयतीला ग्रामस्थांनी घेराव घातला व गांव दारूमुक्त झालेच पाहिजे अशी मागणी केली.

गावात जागोजागी दारूची दुकाने आहेत. दोन ते अडीच हजार लोकवस्तीच्या गावात जवळजवळ १५ दारुची दुकाने आहेत. दारुच्या व्यसनपायी अनेक महिलांना कुटुंब चलवतांना समस्या निर्माण होतात.

अनेकांना घर चालवणे कठिण होते. दारुच्या व्यसनापायी दिवसभर घाम गाळून पैसा घरापर्यन्त येत नसल्याने कौटुंबिक जीवन विस्कळीत होत आहेत. गावातील युवा पीढ़ी या दारुच्या व्यसनपायी रोजगार, व्यवसाय सोडून दारुच्या नादी लागून त्यांचे आयुष्य व्यसनाधीन होत चालले असल्याची खंत महिलांनी व्यक्त केली.

कुटुंबात कोणीही व्यक्ति दारुच्या आहारी गेल्यास त्याचा त्रास शेवटी महिलांनाच सोसावा लागतो यामुळे महिलांनी एकत्र येऊन ग्रा.पं. कार्यालय गाठले.

पोलिस प्रशासन गोपनीय तक्रारी लक्षात घेत नसल्याने ग्रामपंचयतीने संयुक्त ठराव मंजूर करण्याची मागणी केली. यात सर्व समाजाच्या महिलांनी सहभाग राहिला.

LEAVE A REPLY

*