श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रातर्फे प्रकाशा येथे गंगा दशहरा उत्सव

0
नंदुरबार | प्रतिनिधी : अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा जिल्हा केंद्र नंदुरबार यांच्यावतीने आयोजीत गंगा दशहरा उत्सवाची प्रकाशा येथे सांगता करण्यात आली.

श्री स्वामी समर्थ केंद्रातर्फे गेल्या १६ वर्षांपासून नंदुरबार जिल्ह्यात चांगला पाऊस होऊन दुष्काळ येऊ नये यासाठी गंगा दशहरा उत्सव साजरा करण्यात येतो. यंदाही हा उत्सव साजरा करण्यात आला.

त्यानिमित्ताने प्रकाशा येथे तीर्थक्षेत्रावर उत्सवाची सांगता झाली. जिल्ह्यातील ५१ गावांमधून आलेल्या ६०० सेवेकर्‍यांच्या उपस्थितीत तापीमातेची यथासांग विधीवत पूजा आणि स्वामी महाराजांच्या अधिष्ठानाखाली मानसन्मान करण्यात आला.

यावेळी प्रकाशा येथील उत्सवादरम्यान परिसराला यात्रेचे स्वरुप आले होते.

LEAVE A REPLY

*