विस्थापितांच्या मागण्यांसाठी आंदोलन करणार्‍या मेधा पाटकरांसह आंदोलकांना अटक

0
नंदुरबार / विस्थापितांच्या मागण्यांसाठी तीव— आंदोलन करणार्‍या मेधा पाटकर यांच्यासह प्रमुख आंदोलकांना गुजरात पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी त्यांना रोखले असता त्यांनी रस्त्यावरच आंदोलन करायला सुरूवात केली. यानंतर त्यांना अटक करण्यात आली.
आज सकाळी सुमारे 11 वाजता सरदार सरोवर प्रकल्पाजवळ (कवास जि. छोटा उदयपूर, केवडीया कॉलनी) पोलिसांनी आंदोलकांना रोखले.
केवडीया येथील आदिवासींचे पुर्नवसन झाले नाही, म्हणून वर्षभरापासून आंदोलन सुरू आहे. देशातील वेगवेगळ्या आंदोलनाचे प्रमुख आज या ठिकाणी जाणार होते.

चिमलखेडी येथून गुजरातमार्गे पोहोचत असताना पोलीस अधिक्षकांच्या उपस्थितीत रस्त्यावर कडे करून पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना रोखले.

या आंदोलकांमध्ये सुनीती सु.र., आ. सुनील (मुलताई, मध्यप्रदेश), प्रफुल सामंतरा (ओडीसा), मधुरेशभाई कुमार (दिल्ली), कल्याण दुबळे व बबन पाखले (औरंगाबाद), प्रा.श्याम पाटील (धुळे) तसेच आय.आय.टी मुंबई, दिल्ली विद्यापीठाचे विद्यार्थी असे 200 कार्यकर्ते उपस्थित होते.

रोखण्यात आल्यामुळे आंदोलकांनी अखेर रस्त्यावरच आंदोलन सुरू करण्याचा मार्ग अवलंबिला.

तथापि या सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेतले. ही कारवाई बेकायदेशीर आहे, असे आंदोलकांचे म्हणणे आहे.

LEAVE A REPLY

*