महाराष्ट्र बंद ला नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर शहरातून 100 टक्के प्रतिसाद

0
नवापूर- महाराष्ट्र बंद ला नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर शहरातून 100 टक्के प्रतिसाद मिळाला आहे. परंतू बंदची पुर्वसुचना नसल्याने नागरिक व व्यापारी यांचे प्रचंड हाल झाले.

महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांचा संपूर्ण मागण्या मान्य कराव्या यासाठी राज्यात गेल्या पाच दिवसांपासून वेगवेगळ्या प्रकाराचा संप  सुरू आहे. सोमवारी महाराष्ट्र बंदला आदिवासीबहुल नंदुरबार जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. सकाळी आठ वाजेपर्यंत नवापूर शहरातील दुकाने सुरू होते.

व्यापाऱ्यांना कोणत्याही पूर्वसूचना न दिल्याने भाजीपाला विक्रेते,हॉटेल व्यावसायिक, फळ  विक्रेते, किराणा दुकान व अन्य दुकान सुरू झाली होती.

परंतू काही युवकांनी सकाळी अचानक बंद करण्याचे आवाहन केल्याने धावफळ उडाली. बस स्थानक परिसरातील काही हॉटेल व्यावसायिक यांना सकाळी तयार केलेले पदार्थ चहा, दुध, नाष्टा मोफत वाटप करण्याची वेळ आली

त्यामुळे हॉटेल व्यावसायिक यांचे  किरकोळ नुकसान झाले.आठ वाजेपासून नवापूर शहर कडकडीत बंद करण्यात आले. केवळ अत्यावश्यक सुविधा सुरू आहेत.

नवापूर बंदची पूर्वसूचना नसल्याने अनेकांचे हाल

सोमवारी नवापूर शहर बंद राहिल यासंदर्भात कोणाचीही पूर्वसूचना नसल्याने भाजीपाला विक्रेते व्यापारी व  ग्रामीण भागातील असलेले ग्रामस्थांचे हाल झाले.

रिक्षाभरून आलेले लोकांना बाजार न करता घरी परतीचा प्रवास करावा लागला. यात वेळ व पैसा वाया गेला. भाजीपाला विक्रेते यांना आपला माल कवडीमोल भावात विक्री करून घरी जावे लागेल. शहरात कडकडाट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

नवापूरसह गुजरात राज्यातील उच्छाल देखिल कडकडीत बंद पाळण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

*