बोगस बियाण्यांची विक्री

0
बोरद ता.तळोदा / तळोदा तालुका आदीवासी बहुल तालुका आहे. शेतकर्‍यांचा अशिक्षितपणाचा फायदा घेत अनेक विक्रेते बोगस बियाणे सर्रासपणे विक्री करुन फसवणूक करीत असल्याचे प्रकार वारंवार उघडकीस येतात.
राशी 659 या बीटी वाणावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असल्याने त्याचा उत्पन्नावर परिणाम होवून 6 मे रोजी शासनाकडून या वाणावर निर्बंध घालण्यात आली.
बंदी होऊन 15 दिवसाच्यावर झाले असून अद्यापही ठिकठिकाणी या बियाण्यांची विक्री करण्यात येत असल्याची तक्रार शिवसेनेचे तालुकाध्यक्ष अनुप उदासी यांनी स्थानिक पातळीवरील संबधित अधिकार्‍यांकडे केली होती.
मात्र, थातूर-मातूर कारवाई करून याकडे दुर्लक्ष केल्याच्या आरोप करीत उदासी यांनी दुरध्वनीवरून जिल्हा कृषी विभागाला याबाबत माहिती देवून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली.

या तक्रारीवरुन कृषी विभागाचे जिल्हास्तरिय भरारी पथकातील कृषी विकास अधिकारी उमाकांत पाटील, मोहीम अधिकारी पी.बी.शेंडे, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक ए.एफ.तायडे यांच्या पथकाने गुरुवारी सायंकाळी तळोदा शहरातील चिनोदा चौफुली परिसरात असलेल्या मे.कृषीधन नामक बियाणे विक्रेत्यांच्या दुकानावर धाड टाकून तपासणी केली.

तपासणीत निर्बंध घालण्यात आलेले बियाणे आढळून आले नाही. मात्र, स्टेटमेंट एक व दोन नसल्याकारणाने दोन हजार 265 कॉटन पाकीटांना विक्रीबंद आदेश देण्यात आले.

त्यानंतर पथकाने संबंधित दुकानदारांच्या घरी जाऊन देखील तपासणी केल्याची चर्चा शहरात सुरु असून याबाबत अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही.

वेधशाळेने यंदा पावसाळा लवकर होणार असल्याचे अंदाज वर्तविल्यामुळे शेतकर्‍यांकडून बि-बियाणे व खतांच्या खरेदीची लगबग सुरू झाली आहे.

शासनाच्या आदेशावरून बीटीचे ङ्गराशी 659फ हे वाणवर निर्बंध घालण्यात आला आहे. बोगस बियाणे विक्री करणार्‍याची तपासणी करिता जिल्हास्तरीय भरारी पथके तयार करण्यात आली आहेत.

या पथकाकडून बियाणे विक्री करणार्‍या दुकानांची तपासणी सुरू आहे. बोगस बियाणे विक्री करताना कोणीही आढळले तर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

मागील आठवड्यात प्रकाशा येथील एका बियाणे विक्रेत्याची दुकानित बोगस बियाणे आढळल्याचा प्रकार घडला होता, सदर प्रकार अधिकार्‍यांना चिरी-मिरी देऊन दाबण्यात संबंधीत दुकानदारास यश आले होते, तो दुकानदार कोण? याबाबत सर्वत्र एकच चर्चा गावात सुर आहे.

संबंधीत दुकानदाराचे तळोदा येथे देखील बियानेचे दुकान असल्याचे बोलले जात आहे. संबंदितावर कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

*