क्षत्रिय मराठा समाजातर्फे सात जोडप्यांचा सामुहिक विवाह

0

नंदुरबार / शहरातील गुरूकूलनगरात क्षत्रिय मराठा समाज उन्नती मंडळातर्फे सामूहिक विवाह सोहळयाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळयात सात जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा पार पडला.

अल्प खर्चात, अनिष्ठ रूढी आणि चालीरितींना फाटा देत हा विवाह सोहळा पार पडला. या कार्यक्रमास मराठा समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष रविंद्र मराठे, उद्योजक मंडळाचे आनंदराव चोथे, कल्याण ट्रस्ट सुरत येथील मनोज पवार, जिजाबराव पवार यांच्यासह धुळे, नंदुरबार, जळगांव, पुणे, सुरत, चाळीसगांव यासह विविध भागातील समाज बांधव शेकडोंच्या संख्येने उपस्थित होते.

प्रारंभी नवनीत शिंदे यांनी प्रास्ताविक केले. प्रसंगी समाजाचा पैसा वाचवण्याच्या दृष्टीने कमीत कमी खर्चात विवाह सोहळे अटोपणे, हुंडा पध्दतीला बंदी करणे मुला मुलींच्या शिक्षणासाठी पैसा वाचवणे, समाजात शिक्षणासह इतर प्रगत बाबींबाबत अधिकाधिक जनजागृती व्हावी यासह विविध विषयांवर चर्चा करण्यात येवून मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमात मराठा समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष रविंद्र मराठे व मंडळाचे संचालक लक्ष्मण कदम यांनी मनोत व्यक्त करत, समाजाला प्रगतीच्या दिशेने घेवून जाण्यासाठी शिक्षणाची कास धरून, अनिष्ठ रूढींना फाटा देत कमी खर्चात विवाह लावण्याची गरज असल्याचे मत मांडली.

या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन किरण दाभाडे यांनी तर आभार जितेंद्र खांडवे यांनी मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संजय बोराणे, पमन बोराणे, संतोष पावले, डॉ.विजय बोराणे, भारती बोराणे, पांडूरंग गोरे, लक्ष्मण मोरे, विश्वासराव बोराडे, मंगेश तनपुरे, पंडीत पवार, भाऊराव चौधरी यांच्यासह क्षत्रिय मराठा समाज उन्नती मंडळाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

*