अनैतिक संबंधाच्या संशयातून एकाचा खून

0
नंदुरबार / नंदुरबार शहरालगत होळ शिवारात एका विहिरीलगत असलेल्या घराच्या छतावर एकाने युवकाच्या डोक्यावर व कानावर लोखंडी टॉमी मारून त्याचा खून केला व त्याचे प्रेत एका विहिरीत फेकून दिले.
याप्रकरणी गुजरातमधील चिचोदा येथील एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
असई सुभाष हसरत ठाकरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, नंदुरबार शहरालगत होळतर्फे हवेली शिवारात पहेलवान सुधाकर मराठे यांच्या शेतातील विहिरीलगत असलेल्या घराच्या छतावर अनैतिक संबंधाच्या संशयावरून महारु इंदास ठाकरे रा.चिचोदा, वाका चार रस्ता ता.निझर (गुजरात) याने त्याची दुसरी पत्नी पिंटी महारू ठाकरे हिच्यासोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून भरत तुकाराम कोतवाल (वय 22) रा.होळतर्फे हवेली जि.नंदुरबार याचा दि.26 मे च्या रात्री 8 वाजेनंतर त्याच्या डोक्यावर, तोंडावर, कानावर लोखंडी टॉमीने मारहाण करून त्याला जीवे ठार मारले व त्याचे प्रेत सुधाकर मराठे यांच्या शेतातील विहिरीत फेकून पुरावा नष्ट केला.

याप्रकरणी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात सर्वप्रथम अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. परंतु तपासाअंती भरत कोतवाल याचा खून झाल्याचे निष्पन्न झाल्याने महारू ठाकरे याच्याविरूद्ध भादवि कलम 302 व 201 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास नंदुरबार शहर पोलीस ठाण्यातर्फे करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

*