1 ऑगस्टपासून डिजीटल सातबारा

0

नंदुरबार / येत्या 1 ऑगस्ट रोजी महसुल दिनापासून राज्यातील प्रत्येक नागरीकाला त्याचा डिजीटल सात-बारा ऑनलाईन उपलब्ध होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी आज पत्रकार परिषदेत बोलतांना दिली.

यावेळी अप्पर जिल्हाधिकारी राहुल पवार, उपजिल्हाधिकारी राहुल पाटील आदी उपस्थित होते.

राज्यात केंद्र पुरस्कृत डिजीटल इंडिया लँड रेकॉर्ड मार्डनाईझेशन कार्यक्रमांतर्गत पुणे येथील राष्ट्रीय सुचना विज्ञान केंद्राने ई-फेरफार आज्ञावली विकसीत केली आहे.

या आज्ञावलीची प्रत्यक्ष अंमलबजावणी यशस्वी करण्यासाठी स्टेट डाटा सेंटर याठिकाणी स्थापित केलेल्या अभिलेखांचा अद्ययावत डाटा मुळ हस्तलिखीत अभिलेखांची जुळवून तो बिनचुक करण्यासाठी 1 मेपासून राज्य शासनाने सर्व जिल्ह्यात चावडीवाचन मोहिम हाती घेतली आहे, अशीही माहिती यावेळी जिल्हाधिकार्‍यांनी दिली.

सातबार्‍यामध्ये अचूक संगणकीकृत अधिकार अभिलेखांसाठी तलाठी, मंडळ अधिकारी व महसुल अधिकार्‍यांकडून चावडी वाचन मोहिम राबविण्यात येणार आहे.

ई-प्रणाली व ई-चावडी प्रणालीची अंमलबजावणी यशस्वी करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. या मोहिमेत सातबार्‍यावर भू-धारणा पद्धती निवडली आहे.

चावडी वाचन मोहिमेचे तीन टप्पे करण्यात आले असून पहिल्या टप्प्यात 1 ते 15 मे दरम्यानच्या खातेदारांनी महा ई-सेवा केंद्र, आपले सरकार पोर्टल, जिल्हा व तालुका ‘सेतू’ या ठिकाणावरुन सातबारा प्राप्त करून घेता येतील.

त्यासंबंधीचे काही आक्षेप असल्यास तलाठी, तहसीलदार यांच्याकडे नोंदवावेत.

त्यासाठी आपण आपला ऑनलाईन सातबारा उतारा योग्य आहे का हे तपासून पाहण्यासाठी महाराष्ट्र शासनाने http://mahabhulekh.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरून खातेदारांना जमिनीचे गा.न.नं. सातबारा उपलब्ध करुन दिलेले आहेत.

या संकेतस्थळावर जावून आपणास आपला सातबारा पाहता येईल.

 

LEAVE A REPLY

*