खुनातील आरोपीने दिल्या पोलिसांच्या हातावर तुरी !

0
मोदलपाडा, ता.तळोदा / खून व मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी असलेला अट्टल गुन्हेगार तळोदा कोर्टाबाहेरुन पोलिसांचे हातावर तुरी देवून पसार झाला.
तळोदा कोर्टासमोरच ही नाट्यमय घटना घडली. या आरोपीला पकडण्याचा पोलीसांनी आटोकाट प्रयत्न केला. परंतू त्यांना यात अपयश आले. या घटनेमुळे मात्र पोलीसांच्या भूमिकेबाबत शंका निर्माण होत आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, अक्कलकुवा तालुक्यातील बीजरीगव्हांण येथील खोजल्या वन्या तडवी याच्यावर तळोदा अक्कलकुवा रस्त्यावर काही दिवसांपूर्वी एक खून केल्याचा आरोप आहे. त्याचबरोबर एक दुचाकी चोरीच्या गुन्ह्यातदेखील तो आरोपी आहे.

दरम्यान आज दुपारी 12.15 वाजेच्या सुमारास त्याला तळोदा कोर्टात हजर करण्यासाठी नंदुरबार येथून आणण्यात आले होते.

मात्र, काही कारणास्तव पुन्हा शहादा न्यायालयात हजर करण्यासाठी त्याला घेऊन जात असतांना कोर्टाच्या समोर आरोपीने हथकडी लावत असतांना पोलिसांचे हात झटकून पसार झाला.

त्याच्यामागे पो.कॉ.संजू भीमसिंग सोनवणे यांनी पाठलाग केला. तसेच आरडाओरडदेखील केली. मात्र, हा आरोपी पसार होण्यास यशस्वी झाला.

याबाबत संजू सोनवणे यांनी तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास दाभाडे करीत आहेत.

LEAVE A REPLY

*