नवापूरात दोन अट्टल मोटरसायकल चोरांना अटक

0
नवापूर / नवापूर पोलीस ठाण्यात मोटरसायकल चोरीसंदर्भात आलेल्या तक्रारींची दखल घेवून नवनियुक्त पोलीस निरीक्षक व्ही.एच. राजपूत यांनी मोटरसायकल चोरीचा छडा लावून 2 अट्टल मोटरसायकल चोरांना ताब्यात घेवून त्यांची चौकशी केली असता त्यांनी चोरीची कबुली दिली.
नवापूर शहरातील 3 ते 4 तक्रारदारांनी याबाबत तक्रार केलेली होती. त्यामुळे आपल्या जनसंपर्काच्या सहाय्याने त्यांनी मोटरसायकल चोरीबाबत माहिती मिळवून अट्टल मोटरसायकल चोरांना ताब्यात घेण्यात यश मिळवले.

यामध्ये पंकज उर्फ विनोद पाटील रा.स्वामी विवेकानंद चौक व विठ्ठल सुरेश भोई रा.जूनी भोईगल्ली यांना ताब्यात घेऊन बोलते केले असता त्यांनी त्यांचे साथीदार निक्की उर्फ वैभव सोनार रा.शितल सोसायटी नवापूर याला ताब्यात घेवून चौकशी केली असता प्राथमिक माहितीत त्यांनी 3 ते 4 गुन्ह्यांची कबुली दिली आहे.

चोरीस गेलेल्या मोटरसायकल कुठे ठेवल्या व त्या विक्री करण्याबाबतची माहितीदेखील मिळाली आहे.

 

LEAVE A REPLY

*