नवापूर अव्वल

0
नंदुरबार / उच्च माध्यमिक शालांत परिक्षेचा निकाल आज जाहीर झाला असून नंदुरबार जिल्ह्याचा निकाल 91.05 टक्के लागला आहे.
नंदुरबार जिल्ह्यातून एकूण 15 हजार 447 विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. 15 हजार 722 विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली. त्यापैकी 14 हजार 315 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

तालुकानिहाय निकालाची स्थिती अशी, अक्कलकुवा तालुक्यातून एकूण 1 हजार 794 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 1790 विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली असून त्यातील 1586 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

एकूण अक्कलकुवा तालुक्याचा निकाल 88.60 टक्के लागला आहे. धडगांव तालुक्यातून 845 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 841 विद्यार्थी परिक्षेला बसले होते. त्यातून 736 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. धडगांव तालुकाच्या एकूण निकाल 87.51 टक्के इतका लागला आहे.

नंदुरबार तालुक्यातून एकूण 4 हजार 698 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 4 हजार 695 विद्यार्थी परिक्षेस बसले त्यातून 4 हजार 288 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

नंदुरबार तालुक्याचा एकूण निकाल 91.33 टक्के लागला आहे. नवापूर तालुक्यातून एकूण 2 हजार 981 विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी 2 हजार 989 विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली.

त्यापैकी 2 हजार 826 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. नवापूर तालुकाच्या एकूण निकाल 95.18 टक्के लागला आहे. शहादा तालुक्यातून 4 हजार 133 विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते.

त्यातून 4 हजार 132 विद्यार्थी परिक्षेस बसले. त्यापैकी 3 हजार 767 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. शहादा तालुक्याचा एकूण निकाल 91.17 टक्के लागला.

तळोदा तालुक्यातून 1 हजार 296 विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी 1 हजार 295 विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली होती. त्यातून 1 हजार 112 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तळोदा तालुक्याचा एकूण निकाल 85.87 टक्के इतका लागला आहे.

LEAVE A REPLY

*