अल्पवयीन बालिकेवर युवकाचा बलात्कार, गुन्हा दाखल

0
नंदुरबार / धडगांव तालुक्यातील भगाणा येथे एकाने 12 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर बालिकेने दिलेल्या फिर्यादीनुसार, नात्या गण्या पावरा रा. सावर्‍या दिगर (ता.धडगांव) याने रात्री 12 वाजेच्या सुमारास त्याच्या राहत्या घरी या बालिकेवर बलात्कार करून तिला जिवे मारण्याची धमकी दिली.
ही बालिका घाबरली असल्याने तिने कुणालाच या घटनेची माहिती लवकर दिली नाही. त्यामुळे या घटनेला 15 दिवस तक्रार देण्यास विलंब लागला.

याप्रकरणी नांत्या गण्या पावरा विरूध्द म्हसावद पोलीस ठाण्यात भादंवि 376, 506 व बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2016 च्या कलम 3 व 4 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास म्हसावद पोलीस ठाण्यातर्फे करण्यात येत आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे.

LEAVE A REPLY

*