अक्कलकुवा बांधकाम विभागाच्या कर्मचार्‍यांची अनुपस्थिती

0
अक्कलकुवा / अक्कलकुवा व मोलगी येथील बांधकाम विभागाच्या कार्यालयात कुणीही कर्मचारी अथवा अधिकारी उपस्थित राहत नसल्याने नागरीकांनी कोणाकडे तक्रार मांडावी, असा प्रश्न पडला असून, आठवडाभरात कार्यालये सुरळीत सुरू न झाल्यास दि.3 जूनला कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा नागरीकांनी दिला आहे.
यासंदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अक्कलकुवा व मोलगी येथे बांधकाम विभागाचे कार्यालय आहे. हा तालुका डोंगराळ असून रस्ते घाटातील आहेत.
अनेक वेळा दरडी कोसळणे, झाडे रस्त्यावर कोसळणे आदी विविध प्रकार घडत असतात. त्यामुळे रस्त्यावरील वाहतुक ठप्प होते. यासंदर्भात तक्रार देण्यासाठी संबंधित कार्यालयात गेले असता कोणीही कर्मचारी अथवा अधिकारी सापडत नाही.

अक्कलकुवा-मोलगी रस्त्यावर देवगोई घाटात गेल्या चार दिवसांपासून रस्त्यावर झाड पडले आहे. त्याबाबत तक्रार घेण्यासाठी कोणी अधिकारी नाही.

त्यामुळे वाहतुक विस्कळीत झाली आहे. हे प्रश्न वारंवार उद्भवत असल्याने या कार्यालयात दोन दिवसात अधिकारी व कर्मचारी नियमित हजर न झाल्यास दि.3 जूनला अक्कलकुवा व मोलगी येथील कार्यालयाला नागरीक टाळा ठोतील, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.

अक्कलकुवा, मोलगी या भागात शासकीय अधिकारी व कर्मचार्‍यांची गैरहजरी हा नित्यांचाच विषय असून यामुळे अनेक कामे खोळंबतात.

LEAVE A REPLY

*