राहुल गांधी आदिवासींचा पारंपरिक ढोल वाजवतात तेव्हा…

0
वाण्याविहीर,ता. अक्कलकुव्वा | वार्ताहर : कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहूलगांधी यांनी गुजरात राज्यातील सागबारा तालुक्यातील देवमोगरा या आदिवासी बांधवांच्या श्रध्दास्थान असलेल्या याहामोगी मातेच्या मंदिरास भेट दिली.

या भेटीजत त्यांनी तेथील पारंपारीक ढोल वाजवून गुजरात राज्यातील विधानसभा निवडणूकीचे जणू काही रणशिंगच फुंकले आहे.

गुजरात राज्यात पुढील सहा महिन्यात विधानसभेच्या निवडणूका आहेत. त्या पार्श्‍वभूमिवर राहूल गांधी यांनी आदिवासी बांधवांची भेट घेतली.

गुजरातचा विकास रात्रीतून झालेला नसुन त्यासाठी कॉंग्रेसचे ७० वर्षांचे योगदान असल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले.

LEAVE A REPLY

*