मुलीच्या हळदीत नाचतांना बापाचा हृदयविकाराने मृत्यू

0
बोरद ता.तळोदा / मुलीच्या विवाहापूर्वीच तिच्या हळदीच्या रात्री आयोजीत कार्यक्रमात नाचत असतांना हृदयविकाराच्या तीव्र झटका आल्याने बापाचा मृत्यू झाल्याची हृदयदावक घटना तळोदा तालुक्यातील बन येथे घडली.
तळोदा तालुक्यातील बन येथील चरणसिंग विजयसिंग नाईक (वय 40) यांची मुलगी नंदा हिचा विवाह दि.23 मे रोजी मालदा येथील मंगल दुल्या मावची यांचा मुलगा कैलास यांच्याशी आयोजीत करण्यात आला होता.

दि.22 रोजी वधू व वर पक्षाकडे रिवाजानुसार आहेर व जेवणाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. बन येथे जेवणाचा कार्यक्रम मोठ्या उत्हासाने संपन्न होत असतांना वधू पिता चरणसिंग नाईक हे पाहुण्यांचे स्वागत करीत असतांना आग्रहाने जेवन वाढीत होते.

चरणसिंग नाईक यांना तीन मुली होत्या. त्यात नंदा ही मोठी मुलगी. तिचा विवाह तोठ्या थाटात करायचा म्हणून ते अत्यंत उत्साहात होते.

दरम्यान, जेवनावेळी नंतर नाचण्याचा कार्यक्रमात चरणसिंग हे नाचत असतांना त्यांना अचानक हृदय विकाराचा तीव्र झटका आला.

LEAVE A REPLY

*