भविष्य सांगणार्‍या नंदीबैलवाल्यांचा भंडाफोड

0
शहादा / घरात अशांती आहे, त्यासाठी विधी करावा लागेल, अशी भिती दाखवून पाच हजार रुपयांची एकाकडून दोन हजार रुपये घेवून फसवणूक करणार्‍या नंदीबैलवाल्या कथीत ज्योतिषांचा अंनिस कार्यक्रत्यांनी भंडाफोड केला.
प्रश्नांची सरबत्ती करताच सपशेल शरणागती पत्करत दोन हजार रुपये वापर करून या महाशयांनी पलायन केले. या घटनेची शहरात चांगलीच चर्चा रंगली आहे.
शहादा शहरातील विजयनगर परिसरात नंदीबैल घेवून एका टोळीने सकाळी दहाच्या सुमारास आगमन केले. अंनिस कार्यकत्यांच्या हे लक्षात येताच त्यांच्यावर पाळत ठेवण्यात आली.

टोळीतील दोघांनी विजयनगरमधील गजानन महाराज मंदिर परिसरातील एका घरात पाणी पिण्याच्या बहाण्याने प्रवेश केला. तेथे आपली कला दाखवत त्यांनी भविष्य कथन केले.

घरातील अशांती दूर करण्याच्या नावाखाली पुजाविधी केली. त्यांच्या बदल्यात पाच हजार रुपयांची मागणी केली. भाविक महिलेने श्रद्धेपोटी दोन हजार रुपये दिले.

पैसे घेवून पुढील सावज शोधण्यासाठी ही टोळी पुढील चौकात उभी राहिली. दरम्यान, अंनिस राज्य सरचिटणीस विनायक सावळे, विपुल रोकडे यांनी या फरवणूकीची माहिती संबंधीत घरातून मिळवली.

त्यानंतर या टोळीला गाठत त्यांच्यावर विविध प्रश्नांचा भडीमार केला. बीड जिल्ह्यातून आलेल्या या टोळीचा म्होरक्या बाळू भिसे याने आधी आम्ही भविष्य सांगत नाहीत, कोणाला फसवित नाही असा दावा केला. जादुटोणा विरोधी कायद्याचा हिसका दाखविल्यावर मात्र दोन हजार रूपये घेतल्याची कबुली दिली.

पोलीस ठाण्यात चला, गुन्हा दाखल होणार असे म्हणताच पैसे परत करत, माफी मागून पलायन केले. यापुढे आम्ही तुम्हाला दिसणार नाही असे म्हणतच काही क्षणातच पळ काढला.

 

LEAVE A REPLY

*