हलक्या प्रतीच्या जमिनीत देशी कापूस लागवडीला प्राध्यान्य द्यावे – डॉ.महाजन

0
नंदुरबार / हलक्या प्रतीच्या जमिनीत अमेरिकन बीटी कापूस लागवडीचा अट्टाहास न करता देशी कापूस लागवड करण्याचे आव्हान धुळे विभागीय विस्तार केंद्राचे कृषी विद्यावेत्ता डॉ.मुरलीधर महाजन यांनी केले आहे.
कोळादा कृषी विज्ञान केंद्र येथे आयोजित करण्यात आलेल्या कापूस उत्पादक परिषदेत ते बोलत होते. कापूस लागवड, खत व्यवस्थापन, वाण निवड, तण व्यवस्थापन आदी बद्दल त्यांनी परिषदेत मार्गदर्शन केले.

कृषी विज्ञान केंद्रात द्वैमासिक होणार्‍या कृषक मंडळात यावेळी कापूस उत्पादक परिषद घेण्यात आली. कार्यक्रमाचे उदघाटन सुभाष नागरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कृषी विभाग, नंदुरबार यांनी केले. या प्रसंगी मुरलीधर महाजन, आर.एस. दहातोंडे, आर.एम. पाटील, जयंत उत्तरवार, पी.सी. कुंदे, यु.डि. पाटील व आर.आर. भावसार उपस्थित होते.

सद्या देशभर भारत सरकार द्वारे दि. 16 मे ते 31 मे या कालावधीत स्वच्छता पंधरवाडा साजरा केला जात आहे. या अनुषंगाने कृषी विज्ञान केंद्रात आयोजित कापूस परिषदेत स्वच्छतेचे महत्व समजावून स्वच्छतेची शपथ घेण्यात आली.

 

LEAVE A REPLY

*