खत विक्रेत्यांना पीओएस मशीन अनिवार्य

0
नंदुरबार / जिल्ह्यातील 218 खत विक्रेत्या शेतकर्‍यांना पीओएस मशीनद्वारे खत विक्री करावी लागणार आहे. शिवाय शेतकर्‍यांना देखील आधार कार्डाशिवाय खते मिळणार असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.
1 जूनपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहितीही कृषी विभागातर्फे देण्यात आली आहे.
रासायनिक खतांच्या विक्रीवरील अनुदान थेट लाभ हस्तांतरण योजनेंतर्गत संंधीत उत्पादक पुरवठा यांना अदा केली जाणार आहे.
शेतकर्‍यांना एमआरपी दरानेच खते बाजारात उपलब्ध होणार आहेत. 1 जूनपासून जिल्ह्यात राबविण्यात येणार्‍या या योजनेसाठी लागणारे पीओएस मशीन हे एमएफएमएस प्रणालीमध्ये नोंदणी केलेल्या किरकोळ विक्रेत्यांना खत उत्पादक, पुरवठादार कंपन्यांमार्फत पुरविण्यात येणार आहेत.

जिल्ह्यात अशा विक्रेत्यांची संख्या 218 आहे. या मशीनमधील नोंदीनुसारच खत उत्पादकांना सबसिडी मिळणार आहे.

शेतकर्‍यांना आधार कार्डावरच खत खरेदी करावी लागणार आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकर्‍याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे.

जिल्ह्यातील सर्व किरकोळ खत विक्रेत्यांनी लवकरात लवकर एमएफएमएसवर नोंदणी करावी जेणेकरून 1 जूनपासून पीओएस मशीनवर खत विक्री करता येईल.

 

LEAVE A REPLY

*