सिलींगपूर येथे दारूबंदीचा ठराव होऊनही सर्रास दारूविक्री

0
नंदुरबार/ तळोदा तालुक्यातील सिलींगपूर येथे दारूबंदीचा ठराव होऊनदेखील गावात दादागिरी करून दारू बनविली जात आहे.
या दारूविक्रेत्यांवर शासनाने तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी सिलींगपूर गावातील महिला मंडळातर्फे जिल्हा पोलीस अधिक्षकांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, सिलींगपूर येथे ग्रामसभा घेवून दारूबंदीबाबत ठराव मंजूर करण्यात आला होता. दारू विक्रेत्याला 20 हजार रूपये दंड व दारू पितांना रंगेहात पकडल्यास 2 हजार 51 रूपये दंड ठोठावण्यात आला आहे.
याबाबत वृत्तपत्रातदेखील विस्तृत बातमी देण्यात आली आहे. परंतु या ठरावाचा कोणताही परिणाम गावातील दारू उत्पादक व विक्रेत्यांवर झालेला नाही.

सर्रास दारू बनविण्याचे काम गावात होत असून तिची विक्रीदेखील होत असल्याने गावातील शांतता व सुव्यवस्था धोक्यात आलेली आहे.

परंतु याबाबत कुठलीच कारवाई हात नसल्याने ग्रामस्थ व विशेषतः गावातील महिला त्रस्त झाल्या आहेत. त्यामुळे त्यांनी जिल्हा पोलीस अधिक्षक राजेंद्र डहाळे यांची भेट घेवून त्यांना एक निवेदन दिले आहे.

 

LEAVE A REPLY

*