गवळी समाजाचा आज नाशिक येथे न्याय मोर्चा

0
नंदुरबार / विरशैव लिंगायत गवळी समाजातील नाशिक रोड येथील चार वर्षीय बालिकेवर झालेल्या अमानुष अत्याचाराच्या निषेधार्थ गवळी समाजाच्यावतीने उद्या दि.24 रोजी नाशिक येथे न्याय मोर्चाचे आयोजन केले आहे.
नाशिक रोड येथे चार वर्षीय बालिकेवर सुभाष झवर या नराधमाने अत्याचार केला. त्यास फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी पिडीत मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी गवळी समाजाच्यावतीने उद्या दि.24 रोजी नाशिक येथील विभागीय आयुक्त कार्यालयावर न्याय मोर्चा काढण्यात येणार आहे.

कुठल्याही घोषणा न देता काळ्या फिती लावून निषेध करण्यात येईल. या मोर्चाला सकाळी 11 वाजता दुर्गादेवी मंदिर, अनुराधा टॉकीजजवळ येथून सुरूवात होईल.

बिटको चौकमार्गे विभागीय आयुक्त कार्यालयात आयुक्तांना निवेदन देवून मोर्चाची सांगता होणार आहे.

धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील समाजबांधवांनी मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन नंदुरबार गवळी समाजाच्यावतीने देमाची लंगडे, प्रा.गंगाराम यादबोले, महादू हिरणवाळे, प्रकाश घुगरे, हेमंत नागापुरे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

*