टेंभा येथे दगडाने ठेचून आईची हत्या

0

पिंपळनेर / स्वत:च्या आईचे डोके दगडाने ठेचून मुलाने आईची हत्या केल्याची घटना टेंभा प्र.वार्सा ता. साक्री येथे घडली. याप्रकरणी मुलाविरूध्द खुनाचा गुन्हा पिंपळनेर ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

मयत अहिल्याबाई

हत्त्येचे कारण समजू शकलेले नाही.

याबाबत माहिती अशी की, टेंभा प्र.वार्सा, ता.साक्री येथे राहणारी अहिल्याबाई दुर्जन देसाई (वय 50) या महिलेच्या डोक्यावर तिचा मुलगा रायमल दुर्जन देसाई याने दगड टाकून दि.21 मे रोजी दुपारी 12 वाजता हत्त्या केली.

हत्त्येचे कारण समजू शकले नाही. याबाबत सायमल दुर्जन देसाई यांनी पिंपळनेर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. भादंवि 302 अन्वये रायमल देसाईविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुलाने आईचा खून केल्याची या परिसरातील ही पहिलीच घटना असून या घटनेमुळे सारा परिसरच हादरुन गेला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केलेले असली तरी कारण गुलदस्त्यात आहे.

पिंपळनेर पोलिसांनी रायमल देसाईला अटक केली आहे. दरम्यान या घटनेची माहिती समजताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

आरोपी रायमल देसाई

 

LEAVE A REPLY

*