कंजरवाडा परिसरात नागरी सुविधा देण्याची मागणी

0
नंदुरबार । दि.27 । प्रतिनिधी-नंदुरबार। प्रतिनिधी- शहरातील कंजरवाडा व गौतम नगर परिसरात नागरीक सोयी सुविधा देण्यात याव्यात. अशी मागणी शिवसैनिक मनोज चव्हाण यांनी न.पा. मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
कंजरवाडा व गौतम नगर परिसरामध्ये गेल्या एक ते दिड वर्षापासून पथदिवे बंद आहे. या परिसरात गटारी फुटलेल्या असून रस्त्यावरून पाणी वाहत आहे.
तसेच रस्ते देखील खराब झाला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीचे गेट ते रेल्वे कॉलनी, कंजरवाडा हा रस्ता देखील गेल्या 50 वर्षापासून डांबरीकरण झालेले नाही.
या रस्त्यावर पथदिवे नाही. रोडला लागून मोठ मोठे काटेरी झुडपे देखील आहे. ते त्वरीत काढण्यात यावे. या परिसरात 10 हजार लोकवस्ती असून देखील सोयी सुविधा या परिसराला मिळत नाही.

तसेच या परिसरात अनेक नळकनेक्शन असूनही घरमालकांना पाणीपुरवठा होत नाही. यांच्याकडून नळपट्टी व घरपट्टी मात्र शक्तीने वसुल करण्यात येते.

परिसरासाठी असलेल्या बोअरवर सबमर्शिबल मोटार बसविण्यात आली आहे. पण उघडी असल्याने शॉकसर्टी होवून घातपात होण्याची शक्यता आहे.

या सर्व समस्या लक्षात घेवून तातडीने हे सर्व प्रश्न मार्गी लावण्यात यावे. अन्यथा शिवसेनेतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनोज चव्हाण यांनी दिला आहे.

निवेदनावर शितल मच्छले, चचंल नेतले, शोभाबाई गारूगे, राहुल लिंगे, कविताबाई फणसे, सविताबाई घमंडे, रविंद्र कुणबी, बाळु खरताडे, संतोष भालेराव, विलास फुलपगारे, सुमित्रा तमायचेकर, संजय रगडे, सोमा खरताडे, मल्हारी पवार, श्याम सोनवणे, महेश तमाचेकर, गणेश तमाचेकर, प्रकाश इंद्रेकर, रवि बजरंगे, लखन बजरंगे, कुणाल भाट, विशाल मच्छले, मयुर मच्छले, कानसिंग अभंगे व रविंद्र मच्छले यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

 

LEAVE A REPLY

*