एज्युकेशन एक्स्पो प्रदर्शन व चर्चासत्राचे उद्या आयोजन

0
नंदुरबार । दि.23 । प्रतिनिधी-करिअर कसे निवडावे? स्वतःला कसे ओळखावे? यशस्वी करिअरसाठी कोणती कौशल्य असावी? विविध उद्योगातील संधी यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी श्रीराम कोचिंग क्लासेसतर्फे विद्यार्थी, पालक, शिक्षकांसाठी सर्वांगिण माहिती देणारे केजी ते पीजी पर्यंत भव्य प्रदर्शन व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दि.25 जून रोजी उद्घाटन करण्यात येणार आहे.
नंदुरबार शहरातील मंगल भुवन, जैन मंदिराशेजारी, गणपती मंदिर रोड केजी ते पीजी पर्यंतचे विद्यार्थ्यांसाठी शिक्षक, पालकांसाठी भव्य करिअर विषयक सर्वांगिण माहिती देणारे प्रदर्शन व चर्चासत्र ङ्गएज्युकेशन एक्स्पो-2017 चे आयोजन उद्या रविवार दि.25 ते 26 जून रोजी करण्यात आले आहे.
या चर्चासत्रात उपलब्ध असणार्‍या करिअरच्या विविध पर्यायांची माहिती करुन दिली जाईल. तसेच इयत्ता 10 वी, 12 वी नंतरच्या विविध शैक्षणिक वाटांचे माहिती प्रदर्शनांची संपूर्ण माहिती आपल्याला येथे मिळणार आहे.

निवड केलेल्या करिअरच्या क्षेत्रात कामाच्या संधी कोणत्या? तेथील कामाचे स्वरुप कोणते व त्यासाठी कोणती कौशल्य हवीत? याबाबत या चर्चासत्रात संपूर्ण माहिती देण्यात येईल.

तसेच पदवी-पदव्युत्तरनंतर काय? केजी ते पीजी विविध स्पर्धा परीक्षा, प्रवेशप्रक्रीया, स्कॉलरशीप माहिती देणारे असे चर्चासत्र आहे.

रविवार दि.25 जून रोजी सकाळी 10 वाजता मुंबई येथील आशा फाऊंडेशनचे प्रकल्प संचालक गिरीष कुलकर्णी यांचे यशस्वी करिअरसाठी कौशल्य विकासफ तर सायंकाळी 4 वाजता कृषी विज्ञान केंद्राचे प्रकल्प प्रमुख डॉ.राजेंद्र दहातोंडे यांचे ग्रीन करिअर व उद्योगसंधीफ यावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.

तसेच सोमवारी सकाळी 8 वाजता वैद्यकीय व अभियांत्रिकीच्या विविध वाटा व नोकरीच्या संधी याविषयी प्रा.आशिष वाणी व विनायक ढोले मार्गदर्शन करणार आहे.

तर दि.26 जून रोजी सकाळी 10 वाजता शालेय शिक्षण-करिअर निवडीची वाटचाल व पालकांची भुमिका यावर नाशिक येथील मानसोपचार तज्ज्ञ अमोल कुलकर्णी व सायंकाळी 4 वाजता जळगांव येथील दीपस्तंभ फाऊंडेशनचे संचालक प्रा.यजुवेंद्र महाजन ङ्गकरिअर-स्पर्धा परिक्षा, व्यक्तीमत्त्व विकासफ या विषयावर मार्गदर्शन करणार असून विद्यार्थी-पालकांशी मुक्तसंवाद साधणार आहेत.

तरी पाल्यांच्या उज्वल भविष्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन प्रा.आशिष वाणी यांनी केले आहे.

 

LEAVE A REPLY

*