मोदलपाड्यात डेंग्यूची लागण

0
मोदलपाडा । दि.28 । वार्ताहर-तळोदा तालुक्यातील मोदलपाडा येथे एकास डेंग्यूची लागण झाली असल्याचे आढळून आले आहे. मात्र, या प्रकाराबाबत आरोग्य विभाग अनभिज्ञ असल्याचे दिसून येत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, मोदलपाडा येथील रहिवासी सत्यजीत भामू वळवी (वय 21) या तरुणाची अचानक तब्येत बिघडल्याने त्याला नंदुरबार येथील खाजगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
तेथील वैयकीय अधिकर्‍याने विविध वैद्यकीय चाचण्याअंती त्याला डेंग्यू आजाराची लागण झाली असल्याचे सांगितले. त्याची प्रकृती जास्त खालावत असल्याने त्यांना तातडीने धुळे येथील खाजगी सेवा हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले असून अजूनही प्रकृति अस्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.

मोदलपाडा हे आदिवासीबहुल गाव असून या गावात स्थानिक आरोग्य विभागाच्या कर्मचार्‍यांकडून कोणत्याही प्रकारच्या आजाराबाबत जनजागृती वा उपाययोजना करण्यात येत नसल्याचे मोदलपाडा येथील सरपंच बळीराम पाडवी यानी दै. देशदूत शी बोलतांना सांगितले.

याबाबत त्यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होवू शकला नाही. या घटनेची माहिती जि.प.उपाध्यक्ष सुहास नाईक यांनाही कळविण्यात आली आहे.

त्यांनी या घटनेबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी यांना माहिती देऊन सूचित केले आहे.त्यानुसार एक आरोग्य पथक मोदलपाडा येथे रवाना करण्यात येणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले.

मात्र दुपारपर्यंत पथक किंवा आरोग्य विभागाचा अधिकारी, कर्मचारी मोदलपाडा येथे पोहचला नव्हता. संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.रेखा शिंदे या गावात दाखल झाल्याचे समजते.

0यावरून आरोग्य विभागाच्या याबाबत असणारा हलगर्जीपणा अधोरेखित झाला आहे. गावकर्‍यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. गावात आरोग्य विभागाकडून स्वच्छता मोहीम राबवण्याची व धूर फवारण्याची मागणी करण्यात आली आहे.

 

 

LEAVE A REPLY

*