भारतीय स्त्री-शक्ती शाखेतर्फे मातागौरव सोहळा

0
नंदुरबार । दि.26 । प्रतिनिधी-भारतीय स्त्री शक्ती शाखा नंदुरबारतर्फे माता गौरव सोहळा झाला. या कार्यक्रमात 10 वी व 12 वीत प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा व त्यांच्या मातांचा सन्मान करण्यात आला.
सदर कार्यक्रमास अखिल भारतीय महिला कार्य संचालक व समन्वयक गीता गुंडे या प्रमुख वक्ता म्हणून उपस्थित होत्या तर पत्रकार रमाकांत पाटील प्रमुख पाहूणे होते.
आपल्या मनोगतात श्री.पाटील यांनी संस्कारांचे महत्व आधोरेखित केले. आज घडीला संस्कारांची मोठया प्रमाणात आवश्यकता असून मातेचा गौरव हा मुलांच्या मनात संस्कारांचे बीज रूजविणारा आहे. असे मत त्यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या गीता गुंडे यांनी शिक्षण व्यवस्थेचे महत्व आधोरेखित करत शिक्षणाचा वापर हा फक्त नोकरीसाठी न करता समाजासाठी देशकार्यासाठी करावा असे विद्यार्थ्यांना आवाहन केले.

आनंदायी शिक्षण हे उत्तम व्यक्तीमत्व घडणीसाठी आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. सोबतच महिलांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची व परिवत्रनाची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौ.ज्योती कळवणकर व डॉ.वैशाली चव्हाण यांनी केले. परिचय व स्वागत गीता कदम यांनी तर सौ.अंजली वाणी यांनी आभार मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्त्री शक्ती नंदुरबार शाखंच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

 

LEAVE A REPLY

*