आदिवासी महासंघाच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा

0
नंदुरबार । दि.24 । प्रतिनिधी-आदिवासी महासंघातर्फे आज नंदुरबार येथे याहामोगी माता मंदिरात बैठक घेण्यात आली. येत्या 9 ऑगस्ट रोजी होणार्‍या विश्व आदिवासी दिनाच्या कार्यक्रमाची या बैठकीत चर्चा करण्यात आली. तसेच समाजातील विविध मान्यवरांचे सत्कार करण्यात आले.
संदेश राजे वसावे याचा इंडीयन इन्स्टीटयुुट दिल्ली या परीक्षेत भारतात 8 वा क्रमांका आल्याबद्दल त्याच्या गौरव करण्यात आला तसेच आदिवासी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष मेहरबान बर्डे यांना इंडो नेपाल दलित फ्रेंडशीप ऑर्गनायझेशनतर्फे डॉ.बी.आर.आंबेडकर अ‍ॅवार्ड मिळाला. त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
तसेच डॉ.राजेश वळवी व डॉ.राजेश वसावे यांना कोकीळाबेन अंबानी ट्रस्टतर्फे मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
हवाडांग जिल्ह्यातील आदिवासी धर्मप्रचारक लालूभाई वसावा यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. तसेच 9 ऑगस्ट रोजी होणार्‍या विश्व आदिवासी गौरव दिनाच्या कार्यक्रमाबाबत चर्चा करण्यात आली.
त्यात प्रामुख्याने दि.7 ते 14 ऑगस्ट सप्ताह साजरा करण्याचे ठरविण्यात आले. या सप्ताहात विविध वक्त्यांची व्याव्याने प्रत्येक तालुक्यात व प्रत्येक शाळेत घेण्याचे ठरले.
दि.9 ऑगस्ट रोजी संपूर्ण देशात सुट्टी जाहीर करावी अशा ठराव करण्यात आला.

जिल्ह्यात दोन वर्षापासून आदिवासी विद्यार्थ्यांना व संस्थांना नियमीत शिष्यवृत्ती मिळत नसल्यामुळे आंदोलन करण्याचा ठराव करण्यात आला आहे.

जिल्ह्यातील मोठया प्रमाणात शिक्षण संस्था, मायनोरीटीच्या होत असल्याने आदिवासी समाजाला शैक्षणिक संस्थामध्ये नोकर्‍या मिळत नसल्याबद्दल चिंता व्यक्त करण्यात आल. पेसा अ‍ॅक्टची अंमलबजावणी करावी. यासाठी जिल्हाधिकार्‍यांशी चर्चा करावी.

आदिवासी जमिनीतील बेकायदेशीर व्यवहाराबाबत चौकशी करावी आदी विविध विषयांवर यावेळी विचार मंथन करण्यात आले.

या बैठकीला डॉ.भरत वळवी, बी.ई. वसावे, प्रा.भिमसिंग वळवी, दगडु वसावे, डॉ.राजेश वळवी, डॉ.राजेश वसावे, डॉ.योगेश वसावे, डॉ.रोहित वसावे, लालूभाई वसावे, मेहरबान बर्डे, अनिल वळवी, राजा ठाकरे, भुर्‍या ठाकरे, रायसिंग भिल, डॉ. सुनिल गावीत, डॉ.सुनिल वळवी, डॉ.अजीत कोठारी, शशिकांत वळवी, संतोष गावीत, अशोक अहिरे, गुलाब पवार, विष्णु भिल, ए.के. वळवी आदी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

*