नंदुरबार जिल्हा फिजिकल एज्युकेशन फाऊंडेशनच्या जिल्हाध्यक्षपदी प्रा.मयूर ठाकरे

0
नंदुरबार । प्रतिनिधी-नंदुरबार जिल्हा फिजिकल एज्युकेशन फाऊंडेशनच्या जिल्हाध्यक्षपदी क्रीडा संघटक प्रा.मयुर ठाकरे यांची निवड करण्यात आली आहे. ठाणे येथे झालेल्या फिजिकल एज्युकेशन फाऊंडेशन ऑफ इंडीयाच्या बैठकीत त्यांची निवड करण्यात आली.
फिजिकल एज्युकेशन फाऊंडेशन ऑफ इंडीया यांच्यावतीने महाराष्ट्र फिजिकल एज्युकेशन फाऊंडेशनची स्थापना करण्यात आली आहे.

त्याबाबत बैठक नुकतीच ठाणे येथे पार पडली. यावेळी राज्यभरातील प्रत्येक जिल्ह्यातून प्रतिनिधी उपस्थित होते. नंदुरबार जिल्हा फिजिकल एज्युकेशन फाऊंडेशनचे अध्यक्षपद मयुर चंद्रकांत ठाकरे यांना देण्यात आले.

जिल्ह्यात विविध खेळांचा प्रचार व प्रसार करुन खेळासंदर्भातील काम करणारे कार्यकर्ते तथा क्रीडाप्रेमी, क्रीडा शिक्षक यांची वेळोवेळी जिल्ह्यात बैठक घेवून नियोजन करण्यात येणार असून आगामी काळात जिल्ह्यात क्रीडा स्पर्धा व खेळ प्रेमींची चर्चा सत्रे भरविली जाणार आहेत.

जिल्हाध्यक्षपदी निवडीबद्दल महाराष्ट्र सेक्रेटरी डॉ.बलवंत सिंग, आ.चंद्रकांत रघुवंशी, प्रा.दिलीप जानराव, जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड, प्राचार्य शिवाजी पाटील आदींनी अभिनंदन केले.

नंदुरबार जिल्हा फिजिकल एज्युकेशन फाऊंडेशनची प्रथम बैठक दि.6 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता यशवंत विद्यालय येथे होणार आहे.

या बैठकीला जिल्ह्यातील क्रीडा संघटनांचे पदाधिकारी, क्रीडा कार्यकर्ते, राष्ट्रीय खेळाडू, क्रीडाप्रेमी यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन मयुर ठाकरे यांनी केले आहे.

 

LEAVE A REPLY

*