नांदगाव बाजार समितीत २५ हजार क्विंटल कांदा आवक

0

नांदगांव | शेतकरी संप मिटल्यानंतर गेल्या चार दिवसांपासून नांदगाव बाजार समिती मध्ये उन्हाळ कांद्याची आवक वाढली आहे.

आज आवकेचा विक्रमच झालेला असून उन्हाळ कांदा लिलावासाठी सुमारे २५००० हजार क्विंटल कांदा आवक झाली.
दरम्यान, बंद काळात बाजार समितीचे सहा दिवसात दोन कोटीचे नुकसान झाले होते.

आता हळूहळू बाजारसमिती पूर्वपदावर येत असून दिवसेंदिवस आवक वाढत चालली आहे.  सध्या बाजार समितीत भाजीपाला भुसार व इतर मालाचे नियमित लिलाव होत असल्याची माहिती बाजार समिती सचिव अमोल खैरनार यांनी देशदूतशी बोलतांना सांगितले.

LEAVE A REPLY

*