बाहुबलीवरील पुस्तकाचे ‘हे’ आहे नाव; लवकरच होणार प्रकाशित

0

चेन्नई | वृत्तसंस्था :  दिग्दर्शक एस. एस. राजमौली यांनी पडद्यावर उतरवलेला बाहुबली भावला असेल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे.

बाहुबली आता लवकरच पुस्तक रुपातही वाचकांसमोर येणार आहे. हिंदी, तामिळ, मल्याळम आणि तेलगू भाषेत ही पुस्तके उपलब्ध होणार आहेत.

तीन पुस्तकांच्या सिरिजमध्ये ही पुस्तके वेस्टलँड घेऊन येणार आहे. ‘द राईज ऑफ शिवगामी’ असे या सिरिजमधल्या पहिल्या भागाचे नाव असेल. हे पुस्तक आनंद नीलकांतन यांनी लिहिले आहे.

बाहुबली हा विषय असला तरी शिवगामी आणि कटप्पा या पुस्तकातले मुख्य भागांपैकी एक असतील.

LEAVE A REPLY

*