सिनेट निवडणुक : नगरच्या पदरी पराभवाचे दान

विखे बंधू विजयी, तर करडक, चिंधे, खाडेंचा पराभव

0

अहमदनगर : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा म्हणजेच सिनेटच्या सदस्यासाठी झालेल्या निवडणुकीत नगर जिल्ह्यातील विखे पाटील घराण्याने आपली सत्ता अबाधित ठेवली. विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे यांचे सख्खे बंधू राजेंद्र तर चुलत बंधू अनिल हे विजयी झाले. नगरच्या पदवीधरांनी या निवडणुकीत विद्यापीठ विकास मंडळ तयार करून स्वतंत्र पॅनल उतरविले होते. मात्र, या मंडळाला पराभव पत्करावा लागला. डॉ. भारत करडक, सुभाष चिंधे, अमोल खाडे यांनी या मंडळाचे नेतृत्व केले. दरम्यान, मुख्यमंत्र्यांचे चुलत बंधू प्रसेनजीत फडणवीस विजयी झाले.
व्यवस्थापन विभागासाठी 6 जागा होत्या. त्यातील एक जागा उमेदवार न मिळाल्याने रिक्त आहे. एका जागेवर अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्राताई बिनविरोध झाल्या होत्या. नगरचे राजेंद्र विखे, सोमनाथ पाटील, श्यामकांत देशमुख, संदीप कदम विजयी झाले. ते तिघेही पुण्यातील आहेत.
पदवीधरच्या जागेवर अनिल विखे हे एकमेव उमेदवार नगर जिल्ह्यातून विजयी झाले. नाशिकमधून तानाजी वाघ, विजय सोनावणे व विश्‍वनाथ पाडवी हे विजयी झाले. पुण्यातील सहाजणांना विजय मिळाला. संतोष ढोरे, अभिषेक बोके, प्रसेनजीत फडणवीस, शशिकांत तिकोटे, दादासाहेब शिनलकर, बागेश्री मंठाळकर यांचा समावेश आहे. नगरच्या विद्यापीठ विकास मंडळाने चांगली लढत दिली. मात्र, त्यांना विजयापर्यंत पोहोचता आले नाही.

LEAVE A REPLY

*