अहमदनगर : नालेगावकरांनी वेताळबाबा मंदिराचे दिले पुरावे

अनाधिकृत धार्मिक स्थळांच्या यादीतून वगळण्याची मागणी

0

अहमदनगर : नालेगांव येथील वेताळबाबा मंदिर हे 100 वर्षो पुवर्तीचे आहे. तसेच या मंदिरा बाबतचे योग्य ते पुरावे आम्ही सादर केले आहे. त्यामूळे अनधिकृत धार्मिक स्थळांच्या यादीतील नालेगाव येथील वेताळबाबा मंदिर वगळावे अशी मागणी नालेगांव ग्रामस्थांनी महापालिका उपायुक्त विक्रम दरडे यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.

यावेळी प्रा. अरविंद शिंदे व माजी नगरसेवक अर्जुन दातरंगे. समवेत संतोष लांडे, अशोक दातरंगे, अशोक आगरकर, अनिल सुंकी, वैभव वाघ, दीपक घोडेकर, विजय सब्बन, ब्रुसली शेलार, सागर थोरवे, गणेश कुलथे, सागर कदम, सनी आगरकर आदी. उपस्थितीत होते. वेताळ बाबा मंदिर हे 100 वर्ष पूर्वीचे मंदिर आहे. आमच्या दृष्टीने भावनीक व जिव्हाळाचा हा विषय आहे. या देवस्थानाचे सर्व्हेक्षण करतांना महापालिका कोणत्याही प्रकारची चौकशी अथवा त्या भागातील नागरिकांकडून या मंदिराबाबत माहिती घेतलेली नाही. जर घेतली असती तर याबात आम्ही निश्चित समाधानकारक पुरावे सादर केले आहे. तरी या मंदिराचे फेर सर्व्हेक्षण करू सदर मंदिर अनाधिकृत धार्मिक स्थळाच्या यादीतून वगळावे, अशी मागणी या पत्रातून करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

*