मविप्र निवडणूक : एकूण ९२.८५% मतदान; उद्या मतमोजणी

0
नाशिक | मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीस आज सकाळपासून सुरुवात झाली होती. सकाळी आठ वाजेपासून सुरु झालेले मतदान सायंकाळी चार वाजेपर्यंत सुरु होते.
नुकत्याच प्राप्त झालेल्या माहितीनुसार मराठा विद्या प्रसारक समाज निवडणुकीत संपूर्ण जिल्ह्यात ९२.८५  टक्के मतदान झाले आहे. नाशिक शहरातील केटीएचएम महाविद्यालयात उद्या सकाळी मतमोजणीस प्रारंभ होणार असून निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

अनेक दिवसांपासून उत्सुकता लागून असलेल्या निवडणुकीसाठी आज सकाळपासून मतदारांच्या मतदान केंद्रांवर रांगा लागल्या होत्या तर मतदान केंद्रावर दोन्हीही गटाचे समर्थक तळ ठोकून होते.

सकाळपासून मविप्र निवडणुकीत जिल्ह्यातील 14 मतदान केंद्रांवरील 48 बुथवर मतदान प्रक्रिया पार पडली. १०१४७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. उमेदवारांमध्ये सेवकांच्या 3 जागा व इतर 21 जागांवर 52 उमेदवारांचे नशीब आज मतदान पेटीत बंद झाले.

तालुकानिहाय एकूण मतदान :

 

नाशिकममध्ये मराठा हायस्कूल, अभिनव विद्यामंदिर, के. टी. एच. एम. महाविद्यालय या तीन ठिकाणी मतदान पार पडले तर जिल्ह्यात निफाड, सटाणा, चांदवड, सिन्नर, दिंडोरी, कळवण, इगतपुरी, नांदगाव, येवला, मालेगाव, देवळा इथे मतदान प्रक्रिया पार पडली.

मविप्र च्या विद्यमान सरचिटणीस निलीमाताई पवार मतदान करतांना

निकालाची उत्सुकता शिगेला – उद्या (दि.१४) सकाळी आठ वाजेपासून नाशिकमधील के. टी. एच. एम. महाविद्यालयाच्या गोदावरी नदीकाठच्या ग्राउंडवर मतमोजणीला प्रारंभ होईल. निकालासाठी उद्या रात्री सात वाजण्याची शक्यता वर्तविली जाते आहे.

LEAVE A REPLY

*