मुसळगाव सेक्स रॅकेट : विवाहिता अपहरण प्रकरणी संशयाची सुई सिन्नर पोलिसांकडेच

0

नाशिक । दि. 30 प्रतिनिधी

अपहरण करून वेश्या व्यवसायात जबरदस्तीने ढकलण्यात येत असलेल्या बांगलादेशी मुलीची सुटका करण्यासाठी महिनाभरापासून पोलीस ठाण्याचे उंबरठे झिजवणार्‍या युवकास अखेर नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विनय चौबे  यांच्या आदेशाने न्याय मिळाला.

मात्र मुसळगाव, कुंदेवाडी शिवार, सिन्नर शासकीय आयटीआय, माळेगाव एमआयडीसी या ठिकाणी अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर मात्र काहीही कारवार्ई का झाली नाही?

सदर विवाहिता थेट बांगलादेशात कशी पोहोच झाली? यासह अनेक प्रश्न अद्याप अनुत्तरीतच असून या प्रकरणी सिन्नर पोलिसांकडे संशयाची सुई फिरत आहे.

नाशिक येथील जमील नावाच्या युवकाने पीडित युवतीच्या सुटकेसाठी एमआयडीसी तसेच सिन्नर पोलिसांकडे तक्रार केली होती. गंभीर प्रकरण असतानाही पोलिसांनी मात्र केवळ एनसी दाखल करून घेतली होती.

15 दिवस हेलपाटे मारूनही न्याय न मिळाल्याने संबंधित तरुणाने आडगाव मुख्यालय गाठत जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तसेच नाशिक शहराचे पोलीस आयुक्त यांना निवेदन देत न्यायाची मागणी केली होती. त्यांनी संबंधित पोलिसांना तपासाचे आदेशही दिले. मात्र स्थानिक पोलिसांनी त्यांच्या आदेशांना वाटाण्याच्या अक्षता दाखवल्या.

उलट सिन्नर पोलिसांंनी तपासाचा एक अहवाल वजा प्रकरण निकाली काढल्याचे पत्र अधीक्षक तसेच तक्रारदार तरुणाच्या हाती दिले. ज्यामध्ये त्यांनी मुसळगाव येथे तपास केल्यानंतर तेथे संबंधित मुलगी आढळली नाही.

तसेच हा तरुण देत असलेल्या माहितीमध्ये विसंगती असल्याने याची तक्रार खोटी असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला होता.

संबंधित मुलीकडे असलेल्या मोेबाईल क्रमांकाचे डिटेल तर काढलेच परंतु त्यांची संंगती लागत नसून सध्या हा मोबाईल पश्चिम बंगाल, ओडिशा येथे असल्याचे सांगून पोलिसांनी हे प्रकरण निकाली काढले होते.

प्रकरण मानवी तस्करीचे तसेच एका अल्पवयीन मुलीचे आयुष्य बरबाद करणारे असतानाही सिन्नर पोलिसांनी तात्काळ कारवाई का केली नाही?

संबंधित तक्रारदार तरुणाने आपल्या पत्नीस वेश्या दलाल महिला व तिच्या मुलाने जबरदस्तीने डांबून ठेवल्याची तक्रार केली असतानाही त्यांना अटक करण्यात का आली नव्हती? मुलीच्या मोबाईलवरून पहिल्या फोनचे लोकेशन सिन्नर असतानाही ही मुलगी येथे नसल्याचे निष्कर्ष कसे काढण्यात आले?

प्रत्यक्ष दलालांकडे मुलीचा शोघ घेण्याचा प्रयत्न का झाला नाही? दलालांवर कारवाई का झाली नाही? आयजींचे आदेश झाल्यानंतर सिन्नर येथे संबंधित विवाहिता नाही असे सिन्नर पोलीस सांगत असताना मग ती विवाहिता परस्पर बांगलादेश येथे कशी पोहोच झाली? तिला बांगलादेशात कसे पोहोच करण्यात आले? पोलिसांनी त्या विवाहितेला ताब्यात का घेतले नाही? असे अनेक प्रश्न अनुत्तरीत असून यामध्ये सिन्नर पोलिसांचा हात असल्याचे समोर येत आहे.

पोलिसांलेखी ‘तो’ दलाल प्रतिष्ठीत व्यक्ती?

पोलीस अधीक्षकांच्या आदेशानंतर सिन्नर पोलिसांनी तरुणास पोलीस ठाण्यात बोलावून घेतले होते. वेश्या व्यवसायात दलाली करणारी व जिच्या विरुद्ध तक्रार केली ती महिला प्रतिष्ठीत असून तिच्या विरुद्ध केलेली तक्रार मागे घेण्याचा दबाव आणला होता. तसेच तिच्या विरुद्ध आपली काहीच तक्रार नसल्याचे लेखी देण्याची जबरदस्ती सिन्नर पोलिसांनी केल्याचे सदर युवकाने सांगितले.

LEAVE A REPLY

*