शेवगावात एकाच कुटुंबातील चौघांची हत्या

0
शेवगाव | येथील विदयानगर शेवगाव येथे एकाच कुटूंबातील चार जणांची रात्री झोपेतच क्रूरपणे हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

अप्पासाहेब गोविंद हरवणे (वय 58), सुनंदा आप्पासाहेब हरवणे (वय 48) स्नेहल आप्पासाहेब हरवणे (वय 18) व मकरंद आप्पासाहेब हरवणे (वय 15) अशी मृतांची नावे आहेत. घटनास्थळी पंचनामा करण्याचे काम चालु आहे.

रात्री हे कुटुंब झोपेत असतांनाच गळे कापून कुटुंबातील सर्व सदस्यांची हत्या झाल्याचे उघडकीस आले. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

पंचनामा करण्यात येत असून पोलीस आरोपींच्या शोधात आहेत. परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.

LEAVE A REPLY

*