तरूणीसह दोन मुलांची अ‍ॅसिड टाकून हत्या

0
कर्जत (प्रतिनिधी) – तालुक्यातील कर्जत-दुरगांव रस्त्यावरील जंगलामध्ये एक अनोळखी महिला (अदांजे वय 32 वर्षे), एक मुलगा (अंदाजे वय 4 वर्ष) व एक मुलगी (अंदाजे वय 6 वर्ष) या तिघांच्या अंगावर अ‍ॅसिड टाकून हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. या अमानवी कृत्यामुळे तालुका हादरला आहे. घटनास्थळी पोलीस निरीक्षक वसंत भोये, उपनिरीक्षक प्रमोद भिंगारे, देवकाते आणि पोलीस कर्मचार्‍यांनी पंचनामा केला.
कर्जतपासून साधारण 12 किमी अंतरावर कर्जत-दुरगांव रस्त्यावर वनविभागाचे जंगल आहे. या जंगलामध्ये गुरे चारणार्‍यांना दुपारी दोन वाजता 3 अनोळखी मृतदेह दिसले. त्यांनी हा प्रकार गावातील काही जणांना कळवला. वार्‍यासारखी बातमी सर्वत्र पसरली. पोलिसही घटनास्थळी पोहोचले.

कर्जत-दुरगाव रस्त्यावर असलेल्या या जंगलामध्ये रस्त्यापासून 100 मिटर अतंरावर एक कमी खोलीस व थोडा पसरट खड्डा आहे. यामध्ये एका बाजूला सुमारे (वय 32 वर्ष) या अनोळखी स्त्रिचा मुतदेह पडला आहे. या मृतदेहाची अवस्था पहावत नव्हती एवढी भीषण झाली आहे. अंगावर अ‍ॅसिड ओतल्यामुळे मानेपासून खालचा देह पूर्णपणे जळून कातडींचा रंग बदलेला आहे. अजव्या हाताच्या पंजामध्ये हात कापल्यासारखी मोठी खोक पडली आहे.

डोळे राहीलेले नाहीत, केस जळून जमीनीला चिकटले, हातामध्ये धातूच्या बांगड्या आहेत. अगांवरील साडी पाहून ती स्त्री गरीब कुटूबांतील वाटते. त्या महिलेच्या मृतदेहापासून सुमारे 15 फुट अंतरावर छोट्या मुलाचा मृतदेह आहे. जवळच मुलीचा मृतदेह आहे. त्यांच्या अंगावर अ‍ॅसिड ओतल्यामुळे शरीराचे अनेक भाग जळून गेले आहेत.
या मयत स्त्रीचे शरीराचा रंग व चेहर्‍याची ठेवण आणि हातामध्ये असलेल्या धातूच्या बांगडी वरून ती स्त्री परप्रांतीय असावी, असा शक्यता आहे. यामुळे ती लहान मुलेही त्याच महिलेचे असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या तिघांना या जंगलामघ्ये कसे आणण्यात आले हा मोठा प्रश्‍न आहे. या शिवाय त्यांची ज्या निर्घृण पध्दतीने हत्या केली हे पाहता मारणारा किती निर्दयी असावा हे लक्षात येते.
अंगावर अ‍ॅसीड टाकले तेव्हा त्यंाच्या अंगाची खूप लाही झाली असेल मग ते तिथे तसेच कसे पडून राहीले. याचा अर्थ त्यांना येथे आणण्यापूर्वी काही तरी गुंगीचे किंवा विषारी पदार्थ खावू घालण्यात आले होते की त्यांना येथे आणण्यापूर्वीच मारण्यात आले होते आणि नंतर येथे मृतदेह आणून त्यांच्या अंगावर रॉकेल टाकले, असे अनेक प्रश्‍न उपस्थित होत आहेत. जंगल परीसरामध्ये काल रात्री पाऊस पडला होता. यामुळे सर्व प्रकार संशयीत आहे.
जवळच पुलाचे काम सुरू आहे-
ही घटना घडली तिथून जवळच कर्जत-श्रीगंोंदे रस्त्यावर दुरगाव तलाव आहे. या तलावाच्या जवळ असलेल्या रस्त्यावर पुलाचे मोठे काम सुरू आहे येथील ठेकेदार व काम करणारे सर्व परप्रंातिय आहेत. तिथे काम करणारे काही कामगार सकाळपासून गायब झाल्याची माहिती मिळाली. यामुळे त्यांच्यामधील कोणी असावे असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या कामावरील मुकादमास पोलीस आधिकार्‍यांनी बोलवले होते. मात्र त्याने माझ्या कामावर फक्त माणसेच काम करतात महिला नाही, असे सांगितले. मात्र काही कामगार सकाळी गेल्याचे माहितीस त्याने दुजोरा दिला आहे.

LEAVE A REPLY

*