प्रेम प्रकरणातून तरुणाची हत्या केल्याप्रकरणी आठवडच्या चौघांना जन्मठेपेची शिक्षा

0
अ‍ॅड. पुष्पा कापसे-गायके,
सरकारी वकील

अहमदनगर (प्रतिनिधी) – नगर तालुक्यातील आठवड येथे दत्तात्रय बाळासाहेब मोरे (रा. आठवड) या तरुणाची प्रेम प्रकरणातून धारधार हत्याराने हत्या करण्यात आली होती. या खटल्यात चौघांना दोषी धरुन प्रधान जिल्हा न्यायाधीश श्रीकांत कुलकर्णी यांनी आरोपींना जन्मठेप व प्रत्येकी एक हजार रुपये दंड, तो न भरल्यास तीन महिने कारवासाची शिक्षा ठोठावली आहे. सतीश बन्सी लगड (वय 20), बन्सी किसन लगड (वय 50), किसन गणपत लगड (वय 72), आशाबाई बन्सी लगड (वय 45) (सर्व वाघजई मळा, आठवड) अशी आरोपींची नावे आहेत.
बाळासाहेब होमाजी मोरे यांचा मुलगा दत्तात्रय याचे त्यांच्या परिसरात राहणार्‍या एका मुलीवर प्रेम होते. संबंधीत मुलीगी ही दत्तात्रय सोबत विवाह करण्यास ठाम होती. त्यामुळे या दोघांचा विवाह ठरला होता. हा संबंध आरोपींना काही कारणास्तव मान्य नव्हता. त्यामुळे, आरोपींनी दत्तात्रयला अडवून ठार मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर दि. 12 मार्च 2015 रोजी दत्तात्रयने त्यंाच्या घरी सायंकाळी 7:30 वाजता परडी पुजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यासाठी तो कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी गावात गेला होता.

सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास तो घरी आला असता घरासमोर मोटरसायकल लावत असताना आरोपींनी त्याच्या पाठीमागून येऊन धारधार हत्याराने त्याच्या पाठीवर वार करून त्याची निर्घुणपणे हत्या केली होती. दत्तात्रयचा आवाज एकूण त्याचे वडील बाळासाहेब, आई गयाबाई व बहीण मेघा घराबाहेर आल्या असता त्यांनी आरोपींना विरोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी या तिघांनाही लाकडी दांड्याने मारहाण केली. याप्रकरणी बाळासाहेब मोरे यांच्या फिर्यादीनुसार नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेचा तपास सहायक पोलीस निरीक्षक अ‍ॅड. विनोद चव्हाण व सहायक पोलीस निरीक्षक टी. एम. आढाव यांनी केला होता. चौघांना अटक करुन या घटनेचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते.
सोमवारी (दि.12) या खटल्याची सुनावणी प्रधान जिल्हा न्यायाधीश श्रीकांत कुलकर्णी यांच्यासामोर झाली. सरकार पक्षातर्फे एकूण 18 साक्ष तपासण्यात आल्या. त्यात बाळासाहेब मोरे, गयाबाई मोरे, मेघा मोरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. गोसावी, विनोद चव्हाण, टी. आढाव यांच्या साक्ष महत्वाच्या ठरल्या. सरकार पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायालयाने चौघांना खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेप व प्रत्येकी एक हजार रुपये दंड, तो न भरल्यास 3 महिने साधी कैद अशी ठिक्षा ठोठावली आहे. सरकारपक्षातर्फे अ‍ॅड. पुष्पा कापसे-गायके यांनी काम पाहिले. तर अ‍ॅड. दिलीप एच. तौर व अ‍ॅड. माधवराव पाटोदेकर यांनी सहाय्य केले.

LEAVE A REPLY

*