मुंबई शहरातील शाळांना बुधवारी सुटी जाहीर – विनोद तावडे

0

मुंबई | उद्या बुधवारी (दि. 9) रोजी मुंबईमध्ये मराठा आरक्षणासंदर्भातील मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या दरम्यान होणारी गर्दी लक्षात घेता मुंबई शहरातील शाळांना उपरोक्त एक दिवसाची सुटी जाहीर करण्यात येत असल्याचे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज विधानसभेत निवेदनाद्वारे जाहीर केले.

श्री. तावडे म्हणालेउद्या होणाऱ्या मोर्चासाठी मोठ्या संख्येने नागरिक येण्याची शक्यता असल्याने गर्दी होऊन वाहतुकीवर देखील परिणाम होण्याची शक्यता आहे.

यास्तव कायदा व सुव्यवस्था विचारात घेता तसेच विद्यार्थ्यांना शाळेत जाण्या-येण्यासाठी अडचण निर्माण होऊ शकतेहे लक्षात घेता मुंबई शहरातील शाळा एक दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

यामुळे विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान अन्य दिवशी भरून काढण्यात येईलअसेही शालेय शिक्षण मंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

*