श्रीरामपूर तालुक्यातून 15 हजाराहून अधिक कार्यकर्ते मुंबईकडे रवाना

0
श्रीरामपूर (प्रतिनिधी)- मुंबई येथे  मराठा क्रांती मोर्चासाठी श्रीरामपूर तालुक्यातील अनेक कार्यकर्ते मुंबईकडे रवाना झाले. कोणी रेल्वेने, कोणी खासगी गाड्यांनी तर कोणी एस. टी. ने या मोर्चात सहभागी होण्यासाठी रवाना झाले. त्यांना निरोप देण्यासाठी त्यांचे नातेवाईकही यावेळी स्टँडवर व रेल्वे स्टेशनवर मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. तालुक्यातून किमान दहा ते पंधरा हजार कार्यकर्ते रवाना झाले असल्याचा अंदोज वर्तविण्यात आला.
मुंबई येथे होणार्‍या  दि. 9 ऑगस्टच्या मोर्चासाठी श्रीरामपूर येथील कार्यकर्त्यांनी गेल्या आठ दिवसापासून तयारी सुरु केली होती. गावोगाव बैठका घेवून कोण कोण कार्यकर्ते मुंबईला येणार याची यादीही काढण्यात आली होती. कोणी खासगी गाडीने जायचे, कोणी रेल्वेने जायचे आणि कोणी बसने जायचे याबाबतचे नियोजन करण्यात येवून मुंबई येथे कोणी कुठे भेटायचे याबाबतचे नियोजनही श्रीरामपुरातील कार्यकर्त्यांनी केले होते. त्यानुसार काल पंचायत समितीचे सभापती दिपक पटारे, गिरीधर आसने, रामभाऊ लिप्टे, पप्पू पटारे, विलास थोरात, भाऊसाहेब बांद्रे, अभिषेक खंडागळे, सुधीर नवले, शरद नवले यांच्यासह कार्यकर्ते काल सायंकाळीच मुंबईकडे रवाना झाले होते.
तालुक्यातील प्रत्येक गावातून कार्यकर्त्यांनी तयारी दाखविली होती. त्यानुसार सगळेजण ग्रुप ग्रुपने जाण्याचा निणर्मय घेतला यावेळी कार्यकर्ते घोषणाबाजी देत गाड्यांमध्ये बसून श्रीरामपूर शहरातून रवाना झाले. तालुक्यातून किमान दहा ते पंधरा हजार कार्यकर्ते रवाना झाले असल्याचा अंदोज वर्तविण्यात आला.

 

LEAVE A REPLY

*