मुकुंदनगरमध्ये सुगंधी तंबाखू कारखान्यांवर छापा

0
13 लाख 18 हजारांचा माल जप्त, तिघांना अटक
अहमदनगर (प्रतिनिधी) – शहरातील मुकुंदनगरमध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने दोन ठिकाणी छापे टाकले. यात तिघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून सुगंधी तंबाखू, सुपारी, चुना, मावा व 7 मशीन असा 13 लाख 18 हजार रूपयांचा माल हस्तगत केला आहे.
याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकार्‍यांच्या समक्ष भिंगार पोलीस ठाण्यात रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असीफ खुदाबक्ष तांबोळी, मुजीब अजीज खान, मोसीन रफीक शेख (सर्व रा. मुकुंदनगर) अशी आरोपींची नावे आहेत.
गरुवारी (दि. 5) दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांना मुकुंदनगर परिसरात सुगंधी तंबाखू बाबत माहिती मिळाली. त्यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना सूचना दिल्यानंतर अहमदबिला बिल्डिंगमध्ये असीफ तांबोळी यांच्या कारखान्यांवर पहिला छापा टाकण्यात आला.
तेथे मोठा मुद्देमाल मिळाला. याच परिसरात दुसरा कारखाना असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी मौलाना आझाद शाळेच्याजवळ दुसरा छापा टाकला. तेथे मुजीब खान व मोसीन खान यांच्या घरात सुगंधी तंबाखू तयार करण्याच्या मशीन आढळल्या.
दोघांच्या घरातून पोलिसांनी सुगंधी तंबाखू, सुपारी, चुना, मावा व 7 मशीन असा 13 लाख 18 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. आरोपींना ताब्यात घेऊन त्यांची सखोल चौकशी केली असता हा उद्योग अनेक दिवसांपासून सुरू असल्याचे सांगण्यात आले.
या कारवाईनंतर अन्न व औषध विभागाचे अधिकारी प्रशांत लोहार व पी. सी. कसबे यांनी घटनावस्थळी बोलाविण्यात आले. या अधिकार्‍यांनी कारखान्यांतून काही नमुने तापासणीसाठी घेतले आहेत. रात्री उशीरा याप्रकरणी भिंगार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोघांच्या ‘अर्थ’पूर्ण तडजोडीतून…..-   शहरात अनेक ठिकाणी टपरीधारकांकडे गुटखा, सुगंधी तंबाखू मावा असे पदार्थ मिळतात. हा प्रकार पोलिसांना किंवा अन्न व औषध प्रशासन अधिकार्‍यांना माहीत नाही असे नाही. मात्र, दोघांच्या ‘अथ’पूर्ण तडजोडीतून हा प्रकार सुरू असल्याचे बोलले जाते. विशेषता सुगंधी तंबाखूची निर्मिती भिंगार पोलीस ठाण्याच्या हद्दीत होत असली तरी कोतवाली व तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत सर्वात मोठा पुरवठा होत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे यावर आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षकांनीच ठोस भूमिका घेणे गरजेचे आहे.

LEAVE A REPLY

*