एमपीएसएसी लिपिक पदासाठीच्या परिक्षेला 1167 उमेदवार गैरहजर

0

नाशिक : महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससीच्या वतीने लिपिक, टंकलेखक या गट क पदासाठी परिक्षा घेण्यात आल्या. शहरातील एकूण 19 उपकेंद्रावर या परिक्षा घेण्यात आल्या. यात एकूण 6650 विद्यार्थी उपस्थित होते.

या परिक्षेसाठी 1 हजार 167 उमेदवारांनी दांडी मारली.या परिक्षेसाठी एकूण 7 हजार 817 विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. परिक्षेसाठी शासनाकडून 600 कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते.

सर्वच केंद्रावर परिक्षा शांततेत झाली. सर्वच परिक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांसाठी सूचना लावण्यात आल्या होत्या. शिवाय पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता.

कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी विशिष्ट काळजी घेण्यात आली. सर्वच केंद्रावर परिक्षा शांततेत आणि सुरळीत पार पडल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

LEAVE A REPLY

*