MOVIE REVIEW: ‘हाफ गर्लफ्रेंड’

0
चेतन भगत यांच्या नॉव्हेलवर आधारित अनेक चित्रपट तयार करण्यात आले आहेत. आता पुन्हा एकदा त्यांच्या नॉव्हेलवर आधारित चित्रपट तयार करण्यात आला आहे. ‘हाफ गर्लफ्रेंड’ नावाच्या या चित्रपटात अर्जुन कपूर आणि श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत आहेत.
कथा : ही कथा बिहारच्या राहणाऱ्या माधव झा (अर्जुन कपूर) ची आहे. तो दिल्लीत येऊन स्पोर्ट्सच्या कोट्यातून विद्यापीठात प्रवेश घेतो. त्याठिकाणी त्याची भेट रिया सोमानी (श्रद्धा कपूर) बरोबर होते. दोघांची एक आवड सारखी असते आणि ती म्हणजे बास्केटबॉल.
माधवला दिल्लीची राहणारी रियाला आवडायला लागते. पण रिया त्याच्यावर प्रेम करत नसते त्यामुळे ती त्याची हाफ गर्लफ्रेंड बनते. पण काही कारणांमुळे त्यांच्यात मतभेद निर्माण होतात आणि कथा काही वर्षांनी बिहार आणि लंडनपर्यंत पोहोचते. माधवच्या स्टोरीत त्याचा मित्र शैलेश (विक्रांत मास्सी) ची महत्त्वाची भूमिका असते. पण मग माधव आणि रियाच्या स्टोरीचे पुढे काय होणार, हे तुम्हाला चित्रपट पाहूनच समजेल.
डायरेक्शन :
चित्रपटाचे डायरेक्शन उत्तम आहे. लोकेशन्सचा वापरही चांगल्याप्रकारे करण्यात आला आहे. कॅमेरावर्कही चांगले आहे.
चित्रपटाची कथा प्रेडिक्टेबल आहे. त्यात काही नावीण्य नसल्याने बोअर व्हायला लागते. यापूर्वीही चेतन भगतच्या कादंबऱ्यांवर चित्रपट निघाले पण त्या चित्रपटांसारखा हा चित्रपट होऊ शकला नाही.  ज्याप्रकारे चित्रपटाबाबत उत्सुकता होती, तसे काही पाहायला मिळाले नाही.
कलाकारांचा परफॉर्मंस : 
अर्जुन कपूर माधवच्या भूमिकेत चांगला फिट बसला आहे. त्याची बोलण्याची लकबही चांगली आहे. अर्जुनचा मित्र म्हणून कसलेला अभिनेता विक्रांत मस्सीचे काम पाहता, त्याचे भवितव्य चांगले आहे, असे म्हणता येऊ शकते. श्रद्धा कपूर आणि इतर कलाकारांनीही चांगले योगदान दिले आहे.
संगीत : 
चित्रपटाचे संगीत आणि बॅकग्राउंड स्कोर चांगले आहे. त्यातून कथा पुढे सरकत जाते. ‘फिर भी तुमको चाहूंगा’ हे गाणे ठीक ठाक आहे. गाण्यांनाही काही कमाल करता आलेली नाही.
पाहावा की नाही.. 
अर्जुन कपूर आणि श्रद्धाचे मोठे फॅन असाल तर एकदा पाहायला हरकत नाही..

LEAVE A REPLY

*