चित्रपट परीक्षण : ‘सरकार 3’

0
सिनेमा सरकार 3
रेक्टिंग 2 /5
कलाकार अमिताभ बच्चन, मनोज वाजपेयी, जॅकी श्रॉफ, अमित साद , यामी गौतम, रोनित रॉय, रोहिणी हट्टंगडी
दिग्दर्शक रामगोपाल वर्मा
कथा..  
चित्रपटाची कथा सुभाष नागरे उर्फ सरकार (अमिताभ बच्चन ) आणि त्याच्या कुटुंबाच्या भोवताली असलेल्यांच्या जीवनात घडणाऱ्या घटनांवर आधारित आहे. सुभाष नागरेचा नातू चिकू उर्फ शिवजी नागरे (अमित साद) गावातून त्याच्या आजोबाकडे मुंबईत येतो. पण त्याच्या येण्याचे सुभाष नागरेंचा खास असलेल्या गोकुळ (रोनित रॉय) वर चांगलाच परिणाम होतो. सोबतच अनु (यामी गौतम) च्या उपस्थितीनेही कथा अधिक रंजक बनते. तिला तिच्या वडिलांच्या मारेकऱ्याचा शोध घ्यायचा असतो. कथेत देशपांडे (मनोज वाजपेयी) चीही महत्त्वाची भूमिका आहे. तसेच बिझनेसमन मायकल वाल्या (जॅकी श्रॉफ) ही सरकारला उध्वस्त करण्याचा पूर्ण प्रयत्न करतो.
पण स्टोरीचा शेवट वेगळाच आहे, तो समजण्यासाठी तुम्हाला चित्रपट पाहावा लागेल.
दिग्दर्शन..  
चित्रपटाचे दिग्दर्शन, लोकेशन्स आणि कॅमेरा वर्कही चांगले आहे. विशेषतः चित्रीकरण करण्याची पद्धत आणि कॅमेऱ्याचे अॅँगल उत्कृष्ट आहेत.
चित्रपटाच्या शुटिंग दरम्यान बहुतांश ठिकाणी हे रियल ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
चित्रपटाची स्टोरी अगदी नेहमीसारखी आहे. एवढ्या चांगल्या स्टारकास्टचा वापर करण्यासाठी स्क्रीनप्ले अधिक चांगला करता आला असता. चित्रपटात काही विचित्र किंवा खटकणाऱ्या बाबीही आहेत. त्यात जॅकी श्रॉफ आणि त्याचे वेडे प्रेम, अमिताभ बच्चन आणि त्याची चहा प्यायची पद्धत, स्पेशल अपिअरन्समध्ये सारखा झळकणारा अभिषेक बच्चन, मराठी राजकारण्याचा मुलगा असलेल्या अमित सादचे अचानक पंजाबी टोनमध्ये बोलणे. यामी गौतमपेक्षा जास्त संवाद जॅकी श्रॉफची गर्लफ्रेंड म्हणून काम करणाऱ्या अभिनेत्रीचे आहेत. चित्रपटाच्या एकाही सीनचा संबंध पुढच्या सीनबरोबर लागत नाही. मोठे मोठे सिक्वेन्स काही काळानंतर बोल व्हायला होतात. 
कलाकार… 
अमिताभ बच्चन पुन्हा एकदा उत्कृष्ट अॅक्टींग आणि डायलॉग डिलिव्हरी करताना दिसतील. त्यांची उपस्थिती प्रत्येक फ्रेममध्ये ठळकपणे जाणवते. कलाकारांची निवड चांगली आहे. त्यात मनोज वाजपेयींची खास भूमिका आहे. अमित साद, जॅकी श्रॉफ, यामी गौतम, रोनित रॉय, रोहिणी हट्टंगडी सर्वांनी आपली पात्रे चांगल्या प्रकारे साकारली आहेत.
चित्रपटाचे संगीत.. 
चित्रपटाचे संगीत ठिक आहे. विशेषतः बॅकग्राऊंड स्कोअर चांगला आहे. पण काही वेळाने ते लाऊड वाटतो .
पाहावा की नाही.. 
फक्त आणि फक्त अमिताभच्या अॅक्टींगसाठी एकदा पाहू शकता.

LEAVE A REPLY

*