बिताका प्रकल्पासाठी निधी न दिल्यास तिव्र आंदोलन ; पिचड

0
अकोले (प्रतिनिधी) – आढळा विभागाला व संगमनेर तालुक्याला वरदान ठरणार्‍या बिताका प्रकल्पामुळे आढळा धरण पूर्ण क्षमतेने भरत आहे. याचा फायदा या विभागातील शेतकर्‍यांनाच होत आहे, बिताका प्रकल्पाचे राहिलेले अपूर्ण काम आपण पूर्ण करु. या प्रकल्पासाठी लागणारा निधी सरकारने दिला नाही तर सरकारच्या विरोधात तिव्र आंदोलन करु असा इशारा महाराष्ट्र राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री मधुकरराव पिचड यांनी दिला.
देवठाण येथे आढळा धरणाचे जलपुजन माजी मंत्री मधुकररावजी पिचड व अकोले तालुक्याचे आमदार वैभवराव पिचड यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा बँकेचे चेअरमन सिताराम गायकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष मीनानाथ पांडे, अर्थ व बांधकाम समिती सभापती कैलासराव वाकचौरे, कृषी उत्पन्नचे सभापती परबराव नाईकवाडी, रमेश देशमुख, अगस्तीचे संचालक राजेंद्र डावरे, सुनिल दातीर, पं.स. माधवी जगधणे, रंगनाथ पा. वाकचौरे, रामनाथ वाकचौरे, रावसाहेब वाकचौरे, अशोक शेळके, सुहास कर्डिले, मोहन शेळके, अशोक एखंडे, विठ्ठल उगले, विकास शेटे, सुधीर शेळके, अरुण शेळके, कैलास जाधव, अब्दुल इनामदार, श्रीकांत सहाणे, मुरलीधर ढोन्नर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना पिचड म्हणाले की, या सरकारने कर्जमाफी करुन शेतकर्‍यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. अद्याप एकाही शेतकर्‍याला दहा हजार रुपये आगाऊ रक्कम दिली नाही. पिक विमा म्हणजे कंपन्यांचे फायदे असून त्यातून शेतकर्‍याला भुर्दंड सोसावा लागत आहे. शेतकर्‍यांना सरसकट कर्ज माफी करावी, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू कराव्यात, तरच शेतकरी व्यवस्थित जगू शकेल. समृध्दी महामार्गासाठी 75 लाख ते 1 कोटी पर्यंत पैसे दिले जातात, परंतु कर्जमाफीसाठी या सरकारकडे पैसे नाहीत.
अकोले तालुक्यात पाणी अडविण्याचे काम मोठया प्रमाणात झाले असून यांमुळे शेतकरी सुजलाम सुफलाम् बनला आहे. हे सरकार शेतकरी विरोधी असुन शेतककर्‍यांच्या मालाला जो पर्यंत हमीभाव मिळत नाही, तोपर्यंत शेतकर्‍यांची आर्थिक उन्नती होणार नाही. या सरकारच्या सर्व घोषणा फसव्या आहेत, केलेल्या कर्जमाफीमध्ये प्रत्येकी गावात तीन ते चार शेतकरी कर्जमाफीत बसले आहेत. देशाचे माजी कृषी मंत्री शरद पवार यांनी कर्ज माफी दिली, त्यांचा फायदा या देशातील सर्व शेतकर्‍यांना चांगल्या प्रकारे झाला. ज्यांनी साधा तलाव बांधला नाही ते धरणाचे जलपुजन करतात, समाजाची दिशाभुल करुन विकास कामांना आडकाठी निर्माण करण्याचे काम ते करतात.
यावेळी आमदार वैभवराव पिचड म्हणाले की, बिताका प्रकल्पाला निधी मिळावा यासाठी अर्थ व वनमंत्री सुधिर मनगुंटीवार यांची लवकरच भेट घेवून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करु. यासाठी निधी मिळाला नाही तर तिव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला. अकोले तालुक्यात धरणाच्या निर्मितीत पिचड साहेबांचा मोलाचा वाटा आहे. यावेळी सीताराम गायकर, मीनानाथ पांडे, अरुण शेळके, रंगनाथ वाकचौरे, आदींची भाषणे झाली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अनिल रहाणे यांनी केले, तर आभार मोहनबाबा शेळके यांनी मानले. कार्यक्रमास परिसरातील शेतकरी मोठया प्रमाणावर उपस्थित होते.

आदिवासींच्या आरक्षणात धनगर समाजाला आरक्षण देण्याचा या सरकारचा डाव कदापी सफल होऊ देणार नाही, धनगरांना वेगळे आरक्षण द्यावे त्यास आमचा विरोध नाही. मराठा आरक्षाणाच्या संदर्भात सरकारने मराठा समाजाची दिशाभूल केलेली आहे. नोकरी व शैक्षणिक क्षेत्रात मराठा समाजाला आरक्षण द्यावे हीच खरी संपूर्ण मराठा समाजाची मागणी आहे, याकडे हे सरकार जाणूनबजून दुर्लक्ष करीत आहे. आढळा धरणातील टेकड्या व गाळ काढला तर मोठया प्रमाणात पाणी साठा वाढेल त्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करु असे ते म्हणाले.

LEAVE A REPLY

*