श्रीगोंद्यातील गोरक्षक हल्लाप्रकरणी सोमवारी मोर्चा

0

पोलिसांची भूमिका संशायास्पद : एकबोटे

अहमदनगर (प्रतिनिधी) – श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथे 5 ऑगस्टला समाजकटकांनी पोलीस ठाण्याच्या आवारात गोरक्षक शिवशंकर स्वामी आणि त्यांच्या सहकार्‍यांवर जीवघेणा हल्ला केला होता. हा प्रकार पोलीस ठाण्याच्या आवारात घडला. या पोलिसांसमोर गो रक्षकावर हल्ला झाला.

हल्ल्यानंतर या घटनेतील मुख्य आरोपी व त्यांचे अन्य साथीदार फरार आहेत. या प्रकरणात श्रीगोंदा पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे. या हल्ल्याच्या निषेधार्थ सोमवार (दि. 14) रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती अखिल भारतीय कृषी गोसेवा संघाचे पश्‍चिम महाराष्ट्र विभाग अध्यक्ष मिलिंद एकबोटे यांनी पत्रकार परिषेदत दिली.

श्रीगोंद्यात काही समाजकंटक गायी घेऊन चालले होते. ही माहिती गोरक्षक स्वामी आणि त्यांच्या साथीदारांना मिळाली. त्यांनी गायीचे वाहन पकडून पोलीस ठाण्यात आणले. त्याठिकाणी समाजकंटकांनी पोलिसांसमोरच गोरक्षकांवर हल्ला चढवला. गोरक्षकांवर हल्ला होणार असल्याची माहिती श्रीगोंद्याचे पोलीस निरीक्षक व वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांना देण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही या प्रकारकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले. पोलिसांनी कर्तव्यात कसूर केल्यामुळेच समाजकटांनी गोरक्षकांवर हल्ला केला.

या हल्ल्याची वरिष्ठां मार्फत चौकशी व्हावी आणि दोषी असणार्‍या पालीस अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कडक करवाई करण्यात यावी, गोहत्याबंदी कायद्याची कडक अंमलबजावणी व्हावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती एकबोटे यांनी दिली.  यावेळी नगरसेवक योगीराज गाडे, शिव प्रतिष्ठानचे संदीप खामकर, सुपा गो शाळेचे नितीन महाराज शिंदे, हिंदू राष्ट्रसेनेचे परेश खराडे, गजेंद्र सैंदर, महेश निकम, सागर ढुमने, अभिषेक भोसले आदी उपस्थित होते.

बबनराव पाचपुते यांच्यावर कारवाई करा –
माजी मंत्री बबनराव पाचपुते यांचे व अतिफ कुरेशी यांची घनिष्ठ संबध आहेत. पाचपुते यांच्या आशीर्वादाने कुरेशीचे कत्तलखाने सुरू आहेत. पाचपुते यांच्यामुळे कुरेशीला राजकीय पाठबळ मिळत असल्यामुळे तो व त्याचे साथीदार गुन्हे करत आहेत. यामुळे पाचपुते यांच्यावर सुध्दा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात येणार असल्याचे एकबोटे यांनी संागितले.

 

LEAVE A REPLY

*